घरासमोरून दुचाकी लंपास
शिरजगाव कसबा : सायंकाळी घरासमोर उभी केलेली दुचाकी एमएच २७ झेड ३४६ अज्ञाताने लंपास केल्याची घटना २३ जुलै रोजी उघड झाली. विजेंद्र श्रीकृष्ण लोखंडे (३२, रा. करजगाव) यांच्या तक्रारीवरून शिरजगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
डोक्यावर कुऱ्हाड मारून जखमी केले
चांदूर बाजार : जुन्या वादातून चक्कीजवळ बसलेल्या इसमाला कुऱ्हाडीने डोक्यावर व हातावर मारून जखमी करण्यात आले. ही घटना जवळा शहापूर येथे २३ जुलै रोजी सायंकाळी घडली. तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी कुंदन रामटेके, विश्वनाथ रामटेके, वनमाला रामटेके यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
तक्रार दिल्यावरून काठीने डोक्यावर वार
चांदूर बाजार : तुझ्या आईने ग्रामपंचायतीत तक्रार का केली, या कारणावरून युवकाला काठीने मारहाण करण्यात आली. भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या फिर्यादीला व तिच्या पतीला शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना जवळा शहापूर येथे २३ जुलै रोजी घडली. तक्रारीवरून पोलिसांनी सहदेव वानखडे, भानुदास वानखडे व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------------
रस्त्यात चारचाकी उभी केल्याने मारहाण
नांदगाव खंडेश्वर : धान्य भरण्याकरिता चारचाकी वाहन घराजवळ उभे केले असता वाहतुकीला अडथळा केल्याच्या कारणावरून दोन मद्यपींनी इसमाला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना २१ जुलै रोजी रात्री ८ वाजता शिवणी रसुलापूर येथे घडली. प्रदीप राजुरकर यांच्या तक्रावरून नांदगाव पोलिसांनी संदीप दादाराव इंगळे (३०), राहुल इंगळे (३३, रा. शिवणी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------
बांधकामावरील साहित्य चोरताना पकडले
नांदगाव खंडेश्वर : प्लॉटवरील बांधकामाचे सेट्रींग साहित्य चोरून नेताना दोघांना पकडण्यात आले. ही घटना २३ जुलै रोजी मालानी पेट्रोलपंपासमोर सायंकाळी घडली. राहुल गुल्हाने यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी प्रदीप पुंजाराम सुकरे (२४) दत्ता वानखडे रा. कंझरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला. दत्ता हा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
-------------
क्षुल्लक कारणावरून भावाला मारहाण
वरूड : क्षुल्लक कारणावरून वाद करून भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शहापूर येथे २३ जुलै रोजी घडली. तक्रारीवरून वरूड पोलिसांनी सलीम खा वल्द हफीज खा, अल्फिया वल्द सलीम खा विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
महिलेची २५५९९ रुपयांनी फसवणूक
धामणगाव रेल्वे : अज्ञात नंबरवरून फोन कॉद्करून बक्षीस लागल्याचे सांगून त्यासाठी पैसे भरावे लागेल, असे सुचविण्यात आले. त्यानुसार ३५ वर्षीय महिलेने पैसे भरले. मात्र, बक्षीस दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तापूर ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी ७४४९९२८१४४ क्रमांच्या सीमधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------
छपरीतून २५ हजारांच्या बकऱ्या लंपास
कुऱ्हा : घराच्या छपरीत बांधलेल्या १० पैकी ५ बकऱ्या (किंमत २५ हजार रुपये) अज्ञाताने चोरून नेल्याची घटना नितेश राजू सोळंके (रा. शंकरनगर कुऱ्हा) यांच्या घरून अज्ञाताने लंपास केल्या. तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
---------------
कापूसतळणीत रेचातून सहा मोटारी लंपास
वनोजा बाग : नजीकच्या कापूसतळणी येथील बंद रेचात फिट केलेल्या सहा मोटारी अज्ञाताने लंपास केल्याची घटना १८ जुलै उघड झाली. राहुल विजय पाटील यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.