अमरावती : शाळा, महाविद्यालय बंद असल्याने तसेच लॉकडाऊनमध्ये अल्पवयीन मुली घरातच लॉक होत्या. त्यामुळे कोरोनाकाळात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे, मसिंग होणे किंवा प्रेमप्रकरणातून निघून जाणे किंवा आई- वडिलांशी भांडण असे प्रकरणे गत पाच महिन्यात कमी घटना घडल्या असून बेपत्ता होण्याचे प्रमाण घटल्याचे शहर ‘भरोसा’ सेलने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पाच महिन्यात शहरातून ४० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. त्यापैकी शहर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन ३८ मुलींचा शोध लावण्यात यश आले आहे. उर्वरित दोन मुलीसुद्धा लवकरच मिळतील, असे भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी सांगितले.
२०१८ मध्ये ७२ मुली बेपत्ता झाल्या होत्या त्या तुलनेत २०१९ मध्ये १०५ तर २०२० मध्ये ५९ मुली बेपत्ता झाल्या. मात्र, २०२१ च्या पाच महिन्यात लाॅकडाऊनमुळे ४० मुली बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांनी त्यापैकी ३८ मुलींचा तपास करून त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
अल्पवयीन मुली बेपत्ता
२०१८-७२
२०१९-१०५
२०२०-५९
२०२१ -४०
बॉक्स
दोन मुली अद्यापही बेपत्ता
अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी आई-वडिलांनी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविला. पोलिसांनी कायद्यानुसार कलम ३६३ नुसार गुन्हासुद्धा नोंदविला. दोन मुलीचा पोलीस शोध घेत असल्याचे भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बॉक्स
शोधकार्यात अडचणी काय?
१) जर एखादी मुलगी बेपत्ता झाली असेल तर तातडीने पोलिसांना न कळविणे
२) मुलगी जर नातेवाईकांकडे गेली असेल किंवा अन्य कारणाने घरातून निघून गेली असेल तेव्हा ती घरी आल्यानंतर त्याची माहिती परत संबधित पोलिसांना न देणे तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांकडून पोलिसांना सहकार्य न मिळणे आदी कारणामुळे अल्पवयीन मुली शोधताना शोधकार्यात अडचणी येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
पोलिसांची यशस्वी कामगिरी
अल्पवयीन मुलीला पळवून नेणे, ती घरून निघून जाणे किंवा प्रियकारासोबत सैराट होणे आदी कारणे जरी असली तरी अल्पवयीन मुलगी मिसिंग झाली तरी अपहरणाचा गुन्हा पोलीस अज्ञात किंवा संशयित आरोपीविरुद्ध दाखल करतात. असे गुन्हे डिटेक्ट करताना पोलिसांचा कस लागतो. यामध्ये कधीकधी तांत्रिक तपास करावा लागतो. मात्र ज्या-ज्या वर्षात मुली बेपत्ता झाल्या त्या सर्व मुली शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यात भरोसा सेलसोबत संबधीत ठाण्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.
बॉक्स
चार मुलांचा शोध
अल्पवयीन मुलीसह चार अल्पवयीन मुले सुद्धा लॉकडाऊनमध्ये बेपत्ता झाले होते. त्यांचा सुद्धा पोलिसांनी तातडीने शोध घेवून चारही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले आहे.
कोट
ज्या मुली बेपत्ता झाल्या त्यापैकी ३८ मुलींचा शोध लागला दोन मुलींचा तपासही प्रगतीपथावर आहे. मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन केले आहे. पुढील तपास सुरु आहे.
- अतुल घारपांडे, पोलीस निरीक्षक भरोसा सेल अमरावती