शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बेपत्ता मोबाईलमुळे वाढले मृत्यूचे गूढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 1:04 AM

भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्मिक मृत्यूवर संशय व्यक्त केला असताना, पोलिसांनी त्यांचा मोाबईल ताब्यात घेण्यात कुठलेही स्वारस्य दाखविलेले नाही.

ठळक मुद्देमसाजवाला गायब : मेमरी कार्डचा पासवर्ड सापडेना

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : येथील प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक राजेंद्र भट्टड यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात स्थानिक पोलीस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांचा मोबाईल, त्यातील कॉल रेकार्ड हा महत्त्वाचा पुरावा असताना, त्याच्या अनुषंगाने तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. सामाजिक व राजकीय संघटनांनी डॉ. भट्टड यांच्या आकस्मिक मृत्यूवर संशय व्यक्त केला असताना, पोलिसांनी त्यांचा मोाबईल ताब्यात घेण्यात कुठलेही स्वारस्य दाखविलेले नाही. मृत डॉक्टरचा मोबाइल गायब असल्याची माहिती पोलीस विभागातील एका जबाबदार कर्मचाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.कुठलाही मृत्यू वा घात प्रकरणात संबंधिताने मृत्युपूर्वी कुणाशी संवाद साधला, हे तपासले जाते. त्या मोबाइलचे कॉल डिटेल्स मागविले जातात. मात्र, डॉ. भट्टड यांच्या मृत्यूवर चहुबाजूने संशयकल्लोळ उठला असताना, पोलिसांनी मृताचा मोबाइल ताब्यात घेतलेला नाही. ५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच रुग्णालयातील रेस्ट हाऊसमध्ये आढळला. मात्र, सामाजिक भीतीपोटी पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी गळफास घेतलेल्या स्थितीतून मृतदेह खाली काढण्यात आला, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे अन्य आत्महत्या प्रकरणाचा तपास जसा थंडबस्त्यात टाकला जातो, तोेच प्रकार डॉ. भट्टड यांच्या आत्महत्या प्रकरणात केला जात आहे की काय, असा संशय सामाजिक व राजकीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत. याशिवाय मृत्यूपूर्वी डॉ. भट्टड यांची मसाज करून देणारी खन्ना नामक व्यक्ती शहरातून पसार झाल्याची माहिती असताना, पोलिसांनी त्या व्यक्तीला किमान चौकशीसाठी तरी बोलावण्याची तत्परता दाखविलेली नाही. त्यामुळे डॉ. भट्टड यांचा मोबाइल ताब्यात घेऊन व त्यातील कॉल डिटेल्स तपासून पोलिसांनी ‘दूध का दूध..’ करावे, मसाज करणाºया व्यक्तीचे बयाण नोंदवावे, अशी दर्यापूरकरांची अपेक्षा आहे.मेमरी कार्ड पडूनचडॉ. भट्टड यांनी ज्या ठिकाणी आत्महत्या केली, त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यासाठी पोलिसांनी डीव्हीआरमधील मेमरी कार्ड ताब्यात घेतले. मात्र, त्यातील साठवून ठेवलेली माहिती वा डाटा उघड करण्यासाठी आवश्यक असलेला पासवर्ड माहीत नसल्याने मेमरी कार्डमधील फुटेजची तपासणी थांबली असल्याची माहिती ठाणेदार नऱेंद्र डंबाळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी