शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

रिलायंस ट्रेंड्सची पार्किंग व्यवस्था बेपत्ता

By admin | Published: November 04, 2016 12:44 AM

अंबादेवी मार्गावरील रिलायंस ट्रेन्ड्सकडे पार्किंगची कुठेही व्यवस्था नसताना महापालिकेच्या बांधकाम

महापालिकेचा वरदहस्त : सरकारी जागेवर बेकायदेशीर पार्किंगअमरावती : अंबादेवी मार्गावरील रिलायंस ट्रेन्ड्सकडे पार्किंगची कुठेही व्यवस्था नसताना महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्यावर मेहेरनजर राखली आहे. दरम्यान रेडिमेड कापडाच्या विक्रीतून अमरावतीकरांचा खिसा खाली करणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्सने पार्किंग व्यवस्थेवर मात्र मौन धारण के ले आहे.येथील अंबादेवी मार्गावर रिलायंस ट्रेन्ड्स हे रेडिमेड कपडे विक्रीचे प्रतिष्ठान आहे. कुबडे ज्वेलर्सकडून ही जागा रिलायंस ट्रेन्ड्सने भाडेतत्त्वावर घेतली आहे. रिलायंस ट्रेन्ड्समध्ये रोज १ हजार ते १२०० ग्राहक भेटी देऊन कापड आणि अन्य खरेदी करतात. मात्र त्या ग्राहकांच्या दुचाकी वा चारचाकी वाहने पार्किंगसाठी रिलायंस ट्रेन्ड्सकडे कुठलीही व्यवस्था नाही. कुबडे ज्वेलर्स आणि हॉटेल रेलिश प्रतिष्ठानांसाठी तेथे पार्किंग व्यवस्था आहे. मात्र तेथील सुरक्षारक्षक रिलायंस ट्रेन्ड्समधील ग्राहकांना तेथे पार्किंग करण्यास मज्जाव करतो. त्यामुळे ग्राहकांना कुबडे ज्वेलर्सच्या बेकायदेशीर पार्किंगसमोर रस्त्यावर वाहने लावावी लागतात. कुबडे ज्वेलर्ससमोरील खुल्या जागेवर तेथील कर्मचारी आणि मालकवर्गांचीच वाहने लागतात. त्यामुळे रिलायंस ट्रेन्ड्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची पार्किंगवरून हुज्जतबाजी होते अब्जावधी रुपये खर्च करून वेलफर्निश्ड मॉल उभारणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्सला ग्राहकांच्या वाहन व्यवस्थेशी कुठलेही सोयरसुतुक नाही. काही दिवसांपूर्वी कुबडे ज्वेलर्स समोर असलेल्या सरकारी जागेवर उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विभागाने उचलून नेली होती. ती सर्व वाहने रिलायंस ट्रेन्ड्मध्ये कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची होती. आम्ही आपल्या मॉलमध्ये आलोत, खरेदीही केली मग पार्किंगची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यावेळी ग्राहकांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र त्यानंतरही लब्धप्रतिष्ठित रिलायंस ट्रेन्डने ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी कुठलीही व्यवस्था केली नाही. आपल्याकडे अधिकृत अशी कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही, असे रिलायंस ट्रेन्डकडून मुजोरपणे सांगितले जाते. अमरावतीकरांच्या खिशावर कोट्यवधींचा डल्ला मारणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्ला कुणाचीही भीती नाही आणि त्यामुळेच येणाऱ्या ग्राहकांशी अदबीने बोलण्याचे औदार्यसुद्धा रिलायंस ट्रेन्ड दाखवीत नाही.