शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

मिशन आनंद : घरापासून तुटलेल्या ज्येष्ठांची दिवाळी गाेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2021 5:00 AM

भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला.  वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा स्पर्श होत आहे, या जाणिवेतून अनेकांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. ते खचितच आनंदाश्रू होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्या घरात, कुटुंब-गोतावळ्यात हयात घालवली, त्यांच्यापासून तुटलेल्या, एकाकी जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ वयोवृद्धांची दिवाळी वलगावातील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात संत गाडगेबाबा मिशनने साजरी केली. वृद्धाश्रमात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठांनी या उपक्रमात  स्वत:ला हिरीरीने सहभागी करून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावर आंनद झळकत होता. भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी नेहमीप्रमाणे पहाटे उठल्यानंतर परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर बोरसे कुटुंबीयांनी त्यांचे अभ्यंग स्नान घडविले. यानंतर दिवाळीचा फराळ देण्यात आला.  वर्षातून एकदा तरी आपल्याला मायेचा हवाहवासा स्पर्श होत आहे, या जाणिवेतून अनेकांना गहिवरून आले. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या. ते खचितच आनंदाश्रू होते.  संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात १६ महिला व १४ पुरुष असे ३० वयोवृद्ध वास्तव्याला आहेत. काही जण स्वत: येथे आले आहेत. काहींना कुटुंबीयांनी आणून सोडले आहे. काही वृद्धांना पोलिसांनी येथे आणले. ते येथील कायमचे सदस्य झाले आहेत. कोरोनाकाळात येथे एकही रुग्ण वा संशयित आढळला नाही. संचालक कैलास बोरसे हे आता त्यांच्याच झालेल्या या कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यांच्या पुढाकाराने हा दिवाळी सोहळा पार पडला. दरम्यान, काही तासांच्या सोहळ्यादरम्यान आनंदाचे क्षण अनुभवत असलेल्या या मंडळींनी कटू आठवणी बाजूला ठेवल्या. 

अनुदानाची प्रतीक्षा घराने टाकलेल्या वृद्धांची काळजी घेणाऱ्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाला चार वर्षांपासून शासकीय अनुदान नाही. ११९६ पासून अस्तित्वात असलेल्या या संस्थेतच या कालावधीत ५२ जणांनी देह त्यागला. लोकांकडून मदत व काही सेवाभावी संस्थांचा निधी यावर आश्रमाचा कारभार आतापर्यंत सुरळीत सुरू आहे. मात्र, दैनंदिन खर्च वहन करण्यासाठी अनुदान हवे, अशी अपेक्षा डॉ. कैलास बोरसे यांनी व्यक्त केली.  

मी १९६४ पासून छायाचित्रणाचे काम केले. शहरातील अनेक नामवंत स्टुडिओमध्ये लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलविण्याचे काम केले. मात्र, वृद्धावस्थेत कुटुंबीयांनी तुमचे तुम्ही पाहा, असे संगितले. काही दिवस रस्त्यावर काढले. अखेर काही छायाचित्रकारांनी येथे आणले. मी येथे समाधानी आहे. - रमेश व्यकंटराव गढमाळे

आपल्या आई-वडिलांचा घरीच सांभाळ करा. वृद्धाश्रमात आणण्याची वेळच येऊ देऊ नका. आणलेच तर त्यांना किमान भेटायला तरी नियमित येत जा. आम्ही येथे असलेल्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेतो. लोकांनी वृद्धाश्रमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदविला पाहिजे.- डाॅ. कैलास बोरसे, संचालक, संत गाडगेबाबा वृद्धाश्रम, वलगाव

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021