शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
3
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
4
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
5
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
6
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
7
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
8
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
9
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
10
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
11
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
12
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
13
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
14
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
15
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
16
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
17
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
18
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
19
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
20
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई

२४ नोव्हेंबरपर्यंत मिशन ‘टॅक्स रिकव्हरी ’

By admin | Published: November 16, 2016 12:14 AM

नगरविकास विभागाने ५०० आणि १ हजारांच्या चलनात कर स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याच्या ...

८.२२ कोटींचा महसूल गोळा : २५ हजार मालमत्ताही लक्ष्यअमरावती : नगरविकास विभागाने ५०० आणि १ हजारांच्या चलनात कर स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका करवसुलीसाठी सज्ज झाली आहे. अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून ११ ते १४ नोव्हेंबरपर्यंत ८.२२ कोटी रूपये महसूल गोळा झाल्याची माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.केंद्रशासनाच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने रद्द झालेले ५०० आणि १ हजाराचे चलन स्वीकारण्यास मुदतवाढ दिल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रपरिषदेला अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्तद्वय विनायक औगड व नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड आदीसह एडीटीपी सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त, एलबीटी अधीक्षकांची उपस्थिती होती.मालमत्ताकर, स्थानिक संस्थाकर, बांधकाम परवानगी शुल्क आणि बाजार परवाना शुल्काच्या माध्यमातून महापालिका कर गोळा करते. या चार विभागांनी ११ नोव्हेंबरपासून ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनाने कराची रक्कम स्वीकारली. शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी असताना कर्मचाऱ्यांनी ८.२२ कोटी रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. यात धनादेशांचाही मोठा वाटा असल्याचे सांगून आयुक्तांनी अमरावतीकरांचे जाहीर आभार मानलेत. दरम्यान २४ नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीच्या अनुषंगाने सहायक आयुक्तांना सहकार्य करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिल्याचे ते म्हणाले. पाचही प्रशासकीय झोनमध्ये मंगळवारपासून करवसुली शिबिर घेतले जात आहे. याशिवाय थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे.बड्यांकडून कर वसुलीअमरावती : मालमत्ताधारक, एलबीटीच्या अखत्यारित येणाऱ्या करधारकांसह बांधकाम परवानगी शुल्क आणि बाजार परवानाविभागातील थकबाकीदारांनी २४ नोव्हेंबरपर्यंत कर भरून पुढील प्रशासकीय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. महफिलसह सांस्कृतिक भवन आणि अन्य बड्यांकडूनही थकबाकी वसूल केल्याचे ते म्हणाले. महापलिकेने ११ नोव्हेंबरपासून करवसुलीसाठी एक चळवळ राबविली. त्यात पालिकेला उत्तम यश मिळाले. ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अन्य ‘ड’ वर्ग महापालिकांच्या तुलनेत अमरावती महापालिका अव्वल ठरली आहे. ज्यांनी रहिवासी मालमत्तेचा वाणिज्यिक वापर चालविला आहे, त्यांनी सुद्धा याविशेष मोहिमेमध्ये सहभागी होऊन सुधारित करभरणा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महिन्याकाठी ११ कोटींचा खर्च आणि ७ कोटींची मिळकत असलेल्या महापलिकेला ८.२२ कोटी रूपयांची वसुली लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले.११ नोव्हेंबरला सर्वाधिक करवसुली ११ नोव्हेंबरपासून ५०० आणि १ हजारांच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून कराची रक्कम स्वीकारण्यात आली. यात ११ ला सर्वाधिक ३.६५ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. १२ तारखेला ८१ लाख, १३ तारखेला ७८ लाख आणि १४ नोव्हेंबरला २.९८ कोटी रुपये जमा झालेत. १५ नोव्हेंबरला सायंकाळी ६ पर्यंत ३९ लाख महसूल गोळा झाला.२५ हजार मालमत्ता ‘अनअसेस ’ महापालिका क्षेत्रातील २५ हजार मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आले होते. त्यांना सुरुवातीला सहा पट दंड ठोठावण्यात आला होता. आमसभेच्या मान्यतेने तो निर्णय बदलला असून अशा मालमत्ताधारकांनी स्वत: समोर येऊन नियमाप्रमाणे दोन पट दंड भरावा, २४ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी स्वत: ‘अ‍ॅप्रोच’ व्हावे, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे. झोनस्तरावर त्यांनी कराचा भरणा करावा.