शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

आमदार बच्चू कडूंना नागपूरला हलवले, दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: January 11, 2023 5:38 PM

बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले

अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा आमदारबच्चू कडू यांचा बुधवारी पहाटे अपघात झाला. अज्ञात भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. येथील खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर दुपारच्या वेळी त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या डोक्याला चार टाके घालण्यात आले. कठोरा नाका ते कठोरा जकात नाक्यादरम्यानच्या आराधना संकुलापुढे हा अपघात घडला.             बुधवारी सकाळी सहा ते ६.१५ वाजेच्या सुमारास बच्चू कडू हे कुरळपुर्णा येथून अमरावती येथील घरी आले. वाहनातून उतरून डिव्हायडर पार करत रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने त्याच मार्गावरील एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. बच्चू कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आ. कडू यांच्या चालक व खासगी सचिवाने धडक देऊन पळणाऱ्या त्या वाहनचालकाचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात तो देखील कोसळल्याची माहिती आहे. दुपारी आ. कडू यांना नागपूर येथे हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येथील रूग्णालयात सामान्यांसह राजकीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची रिघ लागली होती.

बच्चू कडू कालच मुंबईहून अमरावतीत

विशेष म्हणजे बच्चू कडू मंगळवारीच मुंबईहून अमरावतीला आले होते. तर, मंगळवारी रात्री कुरळपुर्णा येथे गेले होते. अमरावतीत परततताच त्यांना अपघात झाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले अपक्ष आमदार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षानंतर बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

अज्ञाताविरूध्द गुन्हा

याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आ. बच्चू कडू यांचे चालक गौरव भोरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकी वाहनधारकाविरुद्ध अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली. कठोरा मार्गावरील एका गृहसंकुलासमोर हा अपघात झाल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी दिली.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूMLAआमदारnagpurनागपूर