शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अचानक ताप आल्याने आमदार रवी राणांना केलं होम क्वारंटाईन; शनिवारी होणार कोरोनाची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 10:30 PM

कोरोनासाठीची तपासणीसाठी शनिवारी सकाळी आमदारांच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जाणार आहे.

अमरावती : बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीनंतर अचानक ताप आला. गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी दिवसभर ताप उतरला नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीय चिंतेत पडले आहेत. आमदार राणा यांच्यावर आनंद काकाणी हे अमरावतीतच उपचार करीत आहेत. 

आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. १०३, १०४ या श्रेणीत ताप होता. त्यांना शरीरभर असह्य वेदना सुरू झाल्या. शिव्हरिंग होते. त्यांच्या अंगावर तब्बल दहा ब्लँकेट टाकल्यावर ते काहीसे स्थिर झाले. नवनीत राणा यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टर आनंद काकाणी यांना आमदार राणा यांच्या निवासस्थानी पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणी करून डॉक्टर काकाणी यांनी आमदार रवि राणा यांच्यावर औषधोपचार सुरू केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आमदार राणा यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. औषधांना प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना रुग्णालयात हलवावे लागेल, असा निर्णय डॉक्टरांनी घेतला. वृत्त लिहिस्तोवर आमदार राणा यांचा ताप कमी झालेला नव्हता. त्यांना अंगभर असलेल्या वेदनाही कायम होत्या. त्यामुळे रात्री त्यांना रुग्णालयात हलविले जाईल, अशी माहिती नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोरोनासाठीची तपासणीसाठी शनिवारी सकाळी आमदारांच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जाणार आहे. खासदार नवनीत यांचाही थ्रोट स्वॅब घेण्याचे वैद्यकीय सूत्रांनी ठरविले आहे. या नमुन्यांचे अहवाल चिंताजनक आले, तर संपूर्ण कुटुंबाचे नमुने तपासणीला पाठविले जातील. 

आमदार राणा क्वारंटाइनआमदार राणा यांना त्यांच्या राहत्या घरी वेगळ्या कक्षात ठेवण्यात आले आहे. अर्थात त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कुणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही. शुक्रवारी दुपारी आमदार राणा यांची त्यांच्या निवासस्थानी दोनदा तपासणी करण्यात आली. ज्वर आणि अंगदुखी ही लक्षणे कायम होती. मुंबईच्या डॉक्टरांचाही सल्लापतीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे चिंताग्रस्त झालेल्या खासदार नवनीत यांनी गुरुवारच्या रात्रीच मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. कोरानाची लक्षणे त्यांनी विचारली. आमदार राणा यांना खोकला नाही; परंतु मुंबईत संबंधित डॉक्टरांनी इलाज केलेल्या काही रुग्णांना खोकला नव्हता. तरीसुद्धा ते कोविड-१९ पॉझिटिव्ह होते, अशी माहिती त्या डॉक्टरांनी दिली. कायम सावध असण्याचा आणि आवश्यक त्या सर्व चाचण्या करवून घेण्याचा सल्ला दिला.  

आमदार राणा यांना गुरुवारी मध्यरात्रीपासून ताप आणि अंगदुखीचा त्रास आहे. 'व्हायरल इन्फेक्शन' किंवा 'हीट स्ट्रोक' असण्याची शक्यता आहे; परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलाइज्ड करण्याचा आणि कोरानासंबंधी चाचण्या करवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल सर्जन यांनाही मी तशी माहिती दिली आहे.     - डॉ. आनंद काकाणी, डायरेक्टर, रेडिएंट हॉस्पिटल, अमरावती.

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस