शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आमदार साहेब, विजेची समस्या एवढी सोपी नाही!

By admin | Published: November 11, 2015 12:14 AM

पालकमंत्री प्रवीण पोटे व आ.रमेश बुंदिले यांनी तालुक्यात गुरूवारी संयुक्त दौरा केला.

ट्रान्सफार्मरची क्षमताच संपली : दुरूस्ती होणार तरी कशी?, नवीन कंत्राटदार नेमून उपयोग काय? त्रस्त नागरिकांचा सवालअंजनगाव सुर्जी : पालकमंत्री प्रवीण पोटे व आ.रमेश बुंदिले यांनी तालुक्यात गुरूवारी संयुक्त दौरा केला. येथील वीज वितरणच्या कार्यालयापुढे त्यावेळी दहिगाव आणि खिराळा येथील ग्रामस्थ विजेच्या समस्या निवारणासाठी सत्याग्रहाला बसले होते. मंत्री व आमदारांनी अंजनगाव-अकोट रस्त्यावर ठिकठिकाणी भूमिपूजन केले. पण या शेतकऱ्यांना भेटण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. दुसऱ्या दिवशी आमदारांनी वृत्तपत्रांना प्रेसनोट दिली, त्यात आठवडाभरात तालुक्यातील विजेचे ट्रान्सफार्मर देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्याचे व नादुरूस्त ट्रान्सफार्मर दुरूस्तीचे आदेश अभियंत्यांना दिल्याचे सांगण्यात आले. मुळात ट्रान्सफार्मरची देखभाल व दुरूस्ती हा विषयच संपला आहे. कमी क्षमतेच्या या यंत्राची देखभाल दुरुस्ती होऊच शकत नाही. ते वारंवार जळतात. त्यांची क्षमता वाढविण्याची नितांत गरज आहे. वीज पारेषण कंपनीने शेतकऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जानेवारी २०१५ ला ४२.५० कोटी रूपयांचे कंत्राट दिले होते. त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गरजांसह परिसरातील इतरही गरजा पूर्ण करण्याची क्षमता होती. पण कंत्राटदाराची हयगय आड आली. गेल्या दहा महिन्यापासून मंदगतीने चालणाऱ्या या कामाची तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती व कसबेगव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे यांनी पालकमंत्र्यांना दिली. प्रलंबित कामानुसार जानेवारी २०१५ ला अचलपूर डिव्हीजनमधील देण्यात आलेल्या कंत्राटात तालुक्यातील पांढरी व लखाडसह अचलपूरमधील हरम, हिरुळपूर्णा व मेघनाथपूर येथे पाच सबस्टेशन उभारण्याचा समावेश होता. पण पांढरीच्या कामाला जेमतेम आता सुरुवात झाली. लखाडमध्ये काहीही नाही. परिसरात एकूण तीनशे पंच्याहत्तर नवीन डीबी तयार करण्याचे कंत्राटात नमूद आहे. पण कंत्राटदाराने अद्याप एकही डीबी लावली नाही. सर्वात महत्त्वाची ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्याची तरतूद होती व ६३ पॉवरच्या ट्रान्सफॉर्मरऐवजी १०० पॉवरचे एकूण ३०० ट्रान्सफार्मर लावण्याची कंत्राटात तरतूद होती. मात्र अकरा महिन्यांत फक्त पन्नास ट्रान्सफार्मर बदलविण्यात आले. या कामाला पूर्ण करण्यासाठी तेरा महिन्यांचा अवधी लागणार आहे. अंजनगाव तालुक्यातील विहिगावपासून पूर्वेस खल्लारकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोनशे केव्हीचे सबस्टेशन ४ आॅक्टोबर २००८ पासून मंजूर आहे. या कामाचा खर्च त्यावेळी ११४ कोटी रुपये होता. मात्र ज्या कंपनीने हे काम घेतले त्या कंपनीने दिलेल्या कालावधीत पूर्ण न केल्याने ते रद्द झाले. तेव्हापासून तीन वेळा निविदा काढल्यात. पण, कंत्राटदार काम का सुरू करीत नाही याचे वीज वितरण कंपनीला काहीही घेणे-देणे नाही. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या सबस्टेशनचे काम झाले असते तर परिसरातील विजेच्या समस्या बऱ्यापैकी दूर झाल्या असत्या. पण याचा पाठपुरावा सोडून आमदार वृत्तपत्रांना प्रसिद्धीच्या प्रेसनोट देत आहेत. अंजनगाव सबस्टेशनवर ३३ केव्हीला क्षमता वाढवून आलेले ५० एम.व्ही.ए.ऐवजी १०० एम. व्ही. ए. चे ट्रान्सफार्मर मंजूर आहेत. पण वीज कंपनीने अजूनही या कामाचे कंत्राट दिले नाहीत. आमदार मात्र ट्रान्सफार्मर देखभाल व दुरूस्तीच्या भानगडीत पडले आहेत. वीज कंपनीची ही मंदगती आमदार पूर्वी स्वत: वीज कंपनीचे मोठे अधिकारी असल्याने चांगल्या तऱ्हेने जाणतात. त्यावर त्यांनी उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांवर मोठे उपकार होतील. कामांचा पाठपुरावा होणे आवश्यकअंजनगाव तालुक्यात शेतीसाठी उभारलेल्या ट्रान्सफॉर्मर्सची क्षमता कमी झाली आहे. कनेक्शनचा भार वाढल्याने ते वारंवार जळतात. दुरूस्त होऊन येईपर्यंत शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो. ओलीत प्रभावीत होते. निर्माणाधीन कामांचा पाठपुरावा योग्यरीतीने झाला तर वीज कंपनीची पुरवठ्याची साधने मोठ्या क्षमतेने शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतात. याकरिता प्रलंबित असलेली कामे त्यांची कारणे शोधून झपाट्याने होणे आवश्यक असल्याचे माजी सभापती शशीकांत मंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.