(फोटो घेणे)
अमरावती : महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने शहरात डेेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहे. नियमित साफसफाईकडे लक्ष नाही. डास फवारणी गायब असून, स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात येत नसल्याने आमदार रवि राणा संतापले. यापुढे महापालिका
दवाखान्यात अनियमितता आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारणार, अशी तंबीदेखील राणांनी मंगळवारी दिली.
महापालिकेत आमदार रवि राणा व आयुक्त प्रशांत रोडे यांनी विषयासंबंधी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक दालनात घेतली. या बैठकीत शहरामध्ये डेंग्यू, मलेरियाचा वाढता प्रभाव आणि संबंधित विभागाकडून होत असलेल्या उपाययोजना, रस्ते, नाली व इतर मूलभूत सोयी सुविधांबाबत आढावा घेण्यात आला. नागरिकांचे पी.आर. कार्डबाबत अर्ज, कार्यवाही, प्रधानमंत्री आवास योजनेबाबत, शहरात महापालिका संकुलाची निर्मिती, प्रस्तावित उद्यान, वृक्ष लागवड, सुकळी येथील कंपोस्ट डेपोसाठी राखीव जागा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, आमदार रवि राणा यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी, डेंग्यू आजारावर प्रतिबंध, उपचार व उपाययोजना आदीविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरामध्ये रस्ते, नाली व इतर मुलभुत सोयी सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. मुख्य रस्त्यावर डांबरीकरण व खडीकरणाचे पॅचेसचे काम त्वरित सुरू करावे तसेच कच्चे रोड मुरुम टाकून दुरुस्त करावे. शहराच्या बाहेरील भागात कच्चा नाल्या तयार कराव्या, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. आढावा बैठकीत शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे, उपायुक्त सुरेश पाटील, उपायुक्त रवि पवार, जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, उमेश ढोणे, अजय बोबडे यांच्यासह युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.