रिक्षाचालकाला ६५ हजारांचे बिल : महावितरणची लालफीतशाहीअचलपूर : एका गरीब सायकल रिक्षा चालकाला आलेल्या-गेलेल्या विद्युत बिलाची महिनेवारी कपात करावी, त्यांचे काढून नेलेले घरगुती मीटर पुन्हा लावून विद्युत पुरवठा नव्याने सुरू करावा, या मागणीसाठी म.रा. वितरण कंपनीच्या प्रभारी कार्यकारी अभियंत्याच्या कक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल ११ तास ठिय्या आंदोलन केले. ठाणेदारांनी मध्यस्थी करून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले.गोवर्धन विहार येथील रहिवासी वासुदेव फुसाजी पालेवार हे सायकल रिक्षाचालक असून त्यांचे घरगुती विद्युत बिल दर महिन्याला अॅव्हरेज प्रमाणे देण्यात येत असल्याने त्यांनी वीज कंपनीकडे तक्रारी अर्ज केला. १८ जुलै रोजी केलेल्या तक्रारी अर्जात त्यांनी विद्युत बिल अधिक येत असल्याने त्यांनी मीटर बदलवून मागितले होते. तरीही अॅव्हरेज बिल देणे सुरू होते व ते भरत होते. त्यांना ११ जनेवारी २०१६ रोजीच्या विद्युत देयकात ६५ हजार ५५० रुपये बिल देण्यात आले. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनसेचे तालुकाध्यक्ष प्रितेश अवघड शहराध्यक्ष विवेक महल्ले, भूषण नागे, सागर डांगे आदी १५ ते २० कार्यकर्ते विद्युत कंपनीच्या कार्यालय, अचलपूर विभाग येथे धडकले. कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी सुटीवर असल्याने त्यांचा प्रभार उपकार्यकारी अभियंता जि.ह. वाघमारे यांच्याकडे होता. ममहाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचेकडे याबाबत जाब मागितला असता विद्युत देयक ३३ हजार नव्वद रुपये भरण्याचे ठरविण्यात आले.सदर बिल एक हजार रुपये महिन्याप्रमाणे भरण्यासाठी परवानगी द्यावी, रिक्षावााल्याच्या घरातील काढून नेलेले मीटर पुन्हा लावावे, त्यांचा विद्युत पुरवठा सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. हे नियमात बसत नसल्याचे सांगत उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांनी नकार दिला असता आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असे म्हणत त्यांच्यात दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. (शहर प्रतिनिधी)ठाणेदारांची मध्यस्थीमनसेच्या अचानक सुरु झालेल्या ठिय्या आंदोलनात पोलीस बंदोबस्तात रात्री ९ वाजले तरी आंदोलन सुरुच होते. शेवटी परतवाड्याचे ठाणेदार यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची मनधरणी सुरु केली. आंदोलन तात्पुरते मागे घ्या म्हणून समजावले. रात्री १० वाजता उपकार्यकारी अभियंता कुंटे यांनी ३-४ दिवसात विद्युत मीटर लावून देतो, असे लेखी आश्वासन नंतर आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले. हे ठिय्या आंदोलन मनसेचे तालुका अध्यक्ष अवघड यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. यामध्ये अंकुश पाटील, दिनेश पवार, भुषण नागे, आदी २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.कार्यकारी अभियंत्यांनी पळ काढलादुपारी ३ वाजले तरी आंदोलन सुरुच होते, आपण याच मिनिटांत लघु शंका करून येतो, असे सांगत प्रभारी कार्यकरी अभियंता वाघमारे त्यांच्या कक्षातून गेले ते परतलेच नाही. त्यांनी आपला भ्रमणध्वनीही बंद करून ठेवला होता.सदर रिक्षावाले गृहस्थ गरीब असून त्यांना अंधारात राहावे लागत असल्याने त्वरित मीटर लावून विद्युत पुरवठा सुरू करावा, तसेच आंदोलन सुरू असताना कार्यालय वाऱ्यावर सोडून पळ काढणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता वाघमारेंना निलंबित करा.- प्रितेश अवघड,तालुका अध्यक्ष मनसेआजच्या आंदोलनामुळे निर्माण झालेली समस्या सोडविण्याऐवजी उपकार्यकारी अभियंता वाघमारे येथून निघून गेले. मोबाईल स्विच आॅफ केला. यामुळे एखादवेळी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो ही बाब आपण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविणार आहोत.- किरण वानखडे, ठाणेदार
मनसेचा वीज कंपनीत तब्बल ११ तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2016 12:03 AM