मागणी : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण हटवा लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : जुळ्या शहरात वाढलेले अतिक्रमण अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनसेच्यावतीने गुरूवारी अचलपूर नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. परतवाडा-अचलपूर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम सुरू आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पोटे यांनी अनेकदा पालिका, तहसील व उपविभागीय अधिकाऱ्यांना अनेकदा पत्र दिले. तरी सुद्धा या दोन्ही प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा १९ जून रोजी मुख्याधिकऱ्यांना पत्र दिले. व २९ जून रोजी अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतरही अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने मनसेने अर्धनग्न आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात शिरून मनसेचे विजय पोटे, सागर पाटील, देवराव केदार, रितेश कडू, जगतराव पोटे, विजय ठाकूर, शाम पिसाट, ताराचंद देवहंस, रूपेश शर्मा आदींनी निदर्शने केली. मनसेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना आंदोलनाचे पत्र दिल्यावर पालिकेतर्फे भूमीअभिलेख व पोलिसांना पत्र देऊन सहकार्य मागण्यात आले. परंतु संबंधित विभागांकडून सहकार्य न मिळाल्याचे पत्र नपतर्फे आंदोलनकर्त्यांना २० जून रोजी देण्यात आले होते. मुख्याधिकारी अमरावतीच्या बैठकीत मनसेचेतर्फे गुरूवारी आंदोलन असतानासुद्धा मुख्याधिकारी प्रदीप जगताप जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित बैठकीला गेले होते. त्यामुळे मनसैनिकांचे त्यांच्या कक्षापुढे ठिय्या आंदोलन सुरू होते.
अचलपूर पालिकेत मनसेचे अर्धनग्न आंदोलन
By admin | Published: June 30, 2017 12:14 AM