शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

आता मोबाईल ॲप लावणार वाहनांच्या अपघाताला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:10 AM

नवे ॲप केले विकसित : जिल्ह्यातील पोलिसांना दिले जाते प्रशिक्षण अमरावती/ संदीप मानकर रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि त्यांचे ...

नवे ॲप केले विकसित : जिल्ह्यातील पोलिसांना दिले जाते प्रशिक्षण

अमरावती/ संदीप मानकर

रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून इंटिग्रेेेेटेड रोड ॲक्सिडेंट डेटा बेस (आयआरएडी) अर्थात आयरॅड या नव्या ॲपची मदत घेतली जाणार आहे. शहरातील १०, तर जिल्ह्यातील ३१ ठाण्यांमधील पोलिसांकडून या ॲपचा वापर केला जात आहे.

आयरॅड ॲपमुळे रस्ते अपघाताची माहिती संकलित करून तात्काळ कार्यवाही होणार आहे. त्यामुळे निश्चित रस्ते अपघातांना आळा बसणार असून त्यात दगावणाऱ्यांच्या संखेेतही कमालीची घट होणार आहे.

महामार्ग सुरक्षा पोलीस विभागाच्यावतीने या ॲपची निर्मती करण्यात आली आहे. या प्रकल्पात पोलीस परिवहन, आरोग्य आणि रस्ते महामार्ग विभागाची प्रमुख जबाबदारी राहणार आहे. नोडल अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील ६० ते ७० पोलीस कर्मचाऱ्यांना ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ॲपमध्ये अपघाताची संपूर्ण माहिती, त्यासंबधी अहवाल अंतर्भूत असेल. या अहवालाची जोडणी थेट सीसीटीएनएस आणि ऑनलाईन एफआयआरशी केली जाणार आहे. त्यामुळे अपघाताची संख्या कमी होण्यास तात्काळ उपाययोजना राबविण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात या ॲपवर पोलीस विभाग, आरटीओ कार्यरत आहेत. लवकरचे आरोग्य विभागही या ॲपवर कार्यरत होणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.

बॉक्स: आतापर्यंत अपघाताची नोंद घेणार

एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास पोलीस अधिकारी येथे जाऊन आयरॅड ॲपमध्ये नोंद करीत आहेत. जर अपघात खड्ड्यांमुळे झाला असेल, तर बांधकाम विभागाकडे ॲपद्वारे सूचित करण्यात येणार आहे. वाहतूक नियम न पाळल्याने अपघात झाल्यावर आरटीओकडे नोंद पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत काही अपघातांच्या नोंदी या आयरॅड ॲपवर वाहतूक पोलिसांनी घेतल्याची माहिती आहे. या ॲपमुळे रस्ते अपघातांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

बॉक्स:

अशी चालणार यंत्रणा

जिल्ह्यात ग्रामीणमध्ये ३१, तर शहरातील १० ठाण्यांमध्ये या प्रकल्पाची रंगीत तालीम झाली. जिल्ह्यातील १०० च्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आयरॅड ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. १५ मार्चपासून प्रत्येक ठाण्यातील अधिकाऱ्यांना या ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील अपघातांची संपूर्ण माहिती व अहवाल या ॲपमुळे एनआयसीकडे जमा होणार आहे. त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. इतकेच नव्हे तर याची माहिती आरटीओ व आरोग्य विभागाकडे असणार आहे.

शहरातील रस्ते अपघात

२०१९

अपघात-४६५

जखमी-३९४

मृत्यू-९२

२०२०

अपघात -३८५

जखमी-२७४

मृत्यू-८१

२०२१

अपघात-१५१

जखमी-१९६

मृत्यू-३८