मोहन राऊत - अमरावतीमतदान केंद्राच्या आत प्रवेश करतेवेळी मतदाराला भ्रमणध्वनी बाहेरच ठेवावे लागणार आहेत. मतदान केंद्रात शंभर मीटरच्या आत एखादा उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी प्रचार करताना आढळल्यास त्याला अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मतदान केंद्रातील खोलीत उमेदवारांशी मतदान अधिकाऱ्यांनी हस्तांदोलन केल्यास थेट नोकरी गमावण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार आहे़ मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आत प्रचार करणे हा निवडणूक कायद्यान्वये गुन्हा असल्याने असा प्रकार आढळल्यास वॉरन्टशिवाय अटक करण्याचा पोलिसांना अधिकार आहे़ उमेदवारांचा निवडणूक मंडप मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरापलीकडे असेल़ मतदारांना ओळखपत्रिका वाटण्यासाठी एक टेबल,दोन खुर्च्या लावाव्या लागतील. या टेबलवर अधिक गर्दी आढळल्यास पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे़ मतदान केंद्राच्या आत मोबाईल मेगाफोन वापरण्यास बंदी आहे़
मतदान केंद्रात मोबाईलबंदी
By admin | Published: October 14, 2014 11:12 PM