शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

बार बंद करण्यासाठी एकवटल्या महिला

By admin | Published: May 06, 2017 12:05 AM

स्थानिक पंचवटी ते आरटी कार्यालयाकडे जाणाऱ्या गॅलेक्सी बारमुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गॅलेक्सी बारविरुद्ध रोष, मद्यपींचा वाढता धुमाकूळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक पंचवटी ते आरटी कार्यालयाकडे जाणाऱ्या गॅलेक्सी बारमुळे या परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा बार त्वरित बंद करावा, अशी मागणी या परिसरातील शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली आहे.ख्रिस्त कॉलनी, आयटीआय कॉलनी, परांजपे कॉलनी, अप्पर वर्धा जागृती कॉलनी परिसरातील गॅलेक्सी बारमध्ये दिवसेंदिवस मद्यपीचा धुमाकूळ वाढला आहे. या ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यांमुळे या परिसरातील महिला, मुली, वृध्द यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच मद्यपी दुकानाबाहेर येवून रस्त्यावर मद्य सेवन करतात. याशिवाय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, वाद घालणे, स्थानिक नागरिकांच्या घराच्या भिंंतीवर लघुशंका करणे आदी अनेक प्रकार या ठिकाणी बिनबोभाटपणे सुरू असल्याने नागरिकांसह महिला-मुलींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा मार्ग अतिशय वर्दळीचा असल्याने रोज शेकडो महिला-मुली व नागरिक या मार्गावरून ये-जा करतात. मद्यपींच्या त्रासामुळे स्थानिकांसह इतरांनाही मन:स्ताप सहन करावा लागतो, असे महिलांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. स्थानिक नागरिक तसेच महिला, मुली, वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या परिसरातील गॅलक्सी बार त्वरित बंद करावा अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुजाता झाडे, संध्या केला, कांता राठी, कविता बेलोरकर, सुभाष भावे, किरण भावे, रेखा भावे, सविता भावे, राधा तायडे, सुषमा येवतकर, शशीकला येवतकर, शिल्पा जोशी, अनिता जोशी, आरती बिजागिरे, नीता खडसे, वंदना चव्हाण, रिना शाह, आरती गुप्ता, वसुधा निशांद, प्रणिता भावे, वंदना देशमुख, नीता देशमुख, अनिता खडतकर, अरूणा देशमुख, वैशाली बिजवार, ज्योती कांडलकर,शुभागी बिजागिरे आदी महिलांनी दिला आहे.