पान १
अमरावती : शहर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईचा जोर वाढविला असून, जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान पाच जणांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मे रोजी झालेल्या रोहन वानखडे हत्या प्रकरणातील सहा आरोपींविरूद्ध मोक्का लावण्यात आला आहे.
शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी प्रतिबंधक कारवाईचा आलेख उंचावत ठेवला आहे. गतवर्षी ३३८९ आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. ती यंदा ऑगस्टपर्यंत तब्बल ४०४२ वर पोहोचली आहे. गतवर्षी अवघ्या पाच आरोपींना तडीपार करण्यात आले. यंदा तो आकडा ४२ वर पोहोचला आहे. सिआरपीसीच्या कलम १०७ अन्वये ३४४१, १०९ अन्वये ४९, ११० अन्वये ३०९, १५१ अन्वये १५, तर बीपी ॲक्टअन्वये ६४ जणांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
////////
काय आहे मोक्का महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) असे या कायद्याचे नांव आहे. भारतीय दंड विधान संहितेच्या कलमाखाली गुन्हेगार, टोळ्यांवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे संबंधित तपास अधिकाऱ्याला वाटल्याने गुन्हेगारांच्या शेवटच्या गुन्ह्य़ाचा दाखला देऊन हा अधिकारी ‘मोक्का’नुसार कारवाईची मागणी नोंदवतो.
///////////////