शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

२५ वर्षांपासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेच नाही, निमकुंड ग्रामपंचायतीचा आदर्श 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 8:49 PM

अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.

- नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील निमकुंड येथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न घेता आदिवासी बांधव अविरोध सदस्य आणि सरपंच-उपसरपंच निवडतात. हा आदर्श, ऐक्य कौतुकास्पद ठरला आहे.अचलपूर तालुक्यातील निमकुंड हे मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले छोटेसे टुमदार आदिवासी खेडे. १८६८ लोकसंख्या आणि बाराशेवर मतदान. नव्वद टक्क््यांहून अधिक कोरकू आदिवासी शेती आणि मजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत, तर समाजकल्याण विभागाची दहावीपर्यंत निवासी आश्रमशाळा. गावात विद्युत पथदिवे, गल्लीबोळात रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी दोन विहिरी, एक बोअर. नजीकच्या मल्हारा येथे आरोग्य उपकेंद्र असल्याने गावात डॉक्टर, परिचारिका भेट देवून तपासणी करतात आदी मूलभूत सुविधा भक्कम आहे.

सदस्य, सरपंचाची निवड गावबैठकीतपूर्वी वझ्झर ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या निमकुंडला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा १९९४ पासून देण्यात आला. तेव्हापासून २०१५ पर्यंत पाच निवडणुका येथे झाल्यात. सर्व सदस्यांची अर्ज भरून अविरोध निवड झाल्यावर सरपंचपदासाठी आरक्षण पाहून निवड करण्याची प्रथा येथे आहे. सार्वत्रिक निवडणूक लागली की, संपूर्ण गावकरी आपसी हेवेदावे दूर सारित एकत्र येतात आणि आरक्षणानुसार सदस्याची निवड होते. जेथे एकापेक्षा जास्त उमेदवार दावा करतात, तेथे सर्वानुमते एकाचे नाव जाहीर होऊन बाकीचे माघार घेतात.

शासनाचा ना पुरस्कार, ना दमडीमागील पाच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अविरोध निवडीचा नवा अध्याय या गावाने लिहिला आहे. मात्र, स्थानिक जिल्हा किंवा राज्य पातळीवर याची २५ वर्षांत दखलच घेतली गेली नाही. कधीकाळी अविरोध निवडणुकीसाठी लाखोंचा निधी देण्याची सत्ताधा-यांची घोषणा निमदरीसाठी पोकळी ठरली. साधे प्रमाणपत्र, अभिनंदन करण्याचे सौजन्य कोणी दाखविले नसल्याची खंत आहे.

२५ वर्षांत चार सरपंच१९९४ ला नव्याने स्थापन झालेल्या निमकुंड ग्रामपंचायतीमध्ये २५ वर्षांत चार सरपंच झाले. ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागांत एकूण नऊ सदस्यसंख्या आहे. विद्यमान सरपंच अनिल आकोले सलग दुसºयांदा अविरोध सरपंचपदी निवडल्या गेले. उपसरपंच अनिल धांडे, तर सदस्य जानकी भुसूम, सुनीता आठवले, निशा साकोमे, हिरालाल बेठे, शीला नागले असून, सचिव जी. व्ही. बेलसरे आहेत.

राज्यात आदर्श अशी आमची आदिवासी ग्रामपंचायत आहे. मागील २५ वर्षांपासून येथे मतदान झाले नाही. सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड गावकरी सर्वानुमते ठरवितात. मात्र, शासनाची उदासीनता पाहता खंत वाटते.- अनिल आकोलेसरपंच, निमकुंड, ता. अचलपूर.

टॅग्स :Amravatiअमरावती