संतोष शेंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : एकीकडे नात्यांमधील गोडवा संपतोय. वृद्ध आई-वडिलांचीदेखील स्वत:च्या संसारात अडचण होते. त्यामुळेच वृद्धाश्रमांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. अशा या कलीयुगात तब्बल २१ वर्षांपासून गरीब वृद्धांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचे व्रत एक तरूण जपतोय.दरवर्षी १०० ते १५० वृद्धांना आधार देत तीर्थस्थळी नेऊन आणण्याचा त्याचा उपक्रम आजही सरूच आहे. त्यामुळेच या तरूणाला आधुनिक श्रावणबाळाची उपमा दिली जात आहे.चांदूरबाजार तालुक्यातील बेसखेडा येथील विजय गोहत्रे असे या आधुनिक श्रावणबाळाचे नाव आहे. दरवर्षी जिल्ह्यातील १०० ते १५० वृद्धांना स्वखर्चातून ते तीर्थयात्रेला घेऊन जातात.मागील २१ वर्षांपासून त्यांची ही ज्येष्ठ नागरिक दिंडीयात्रा सुरू आहे़ यावर्षी ते १४० वृद्घांना वैष्णोदेवीला दर्शनाकरिता नेत आहेत़ जिल्ह्याच्या कोणत्याही भागातील वृद्ध नागरिक असो ते त्यांना तीर्थस्थळी नेतात. आजवर त्यांनी महाराष्ट्रातील शेगाव, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, नाशिक कुंभमेळा आदी धार्मिकस्थळांसह राज्याबाहेरील बाहेरील हरीव्दार ऋषिकेश, वृंदावन, बद्रीनाथ, तिरूपती बालाजी येथे नेले आहे. चंद्रपुरी महाराजांवर त्यांची श्रद्धा आहे. दरवर्षी बेसखेडा येथून ते तीर्थयात्रेला सुरूवात करतात. भोजन ते निवासापर्यंतचा सगळा खर्च गोहत्रे स्वत:च करतात.१४० वृद्ध वैष्णोदेवीकडे आज होेणार रवानायंदा या उपक्रमांतर्गत वृद्धांना वैष्णोदेवीचे दर्शन घडवून आणणार आहेत. रविवार १० सप्टेंबरला बेसखेडा येथून १५० वृद्ध दाम्पत्य तीर्थयात्रेला रवाना होेतील. अमरावती येथून जबलपूर रेल्वेने नागपूरकरिता ते रवाना होतील तेथुन अंदमान एक्सप्रेसने वैष्णव देवीकडे रवाना होणार आहेत. १८ सप्टेंबरला ते अमरावतीला परत येतील, असे विजय गोहत्रे यांनी सांगितले.
वृद्धांना तीर्थयात्रा घडविणारा आधुनिक श्रावणबाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:02 PM
एकीकडे नात्यांमधील गोडवा संपतोय. वृद्ध आई-वडिलांचीदेखील स्वत:च्या संसारात अडचण होते.
ठळक मुद्देविजय गोहत्रे यांचा आदर्श उपक्रम : २१ वर्षे पूर्ण, दरवर्षी १५० गरीब वृृद्घ घेतात लाभ