शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पशुसंवर्धनाच्या आधुनिक बदलाने अर्थव्यवस्था भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी संबंधित आहे, जेणेकरून पशुसंवर्धनात आधुनिक बदल करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.विदेशी जातींपासून संकरीकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम देशीपासून ...

ठळक मुद्देआज पशुसंवर्धन दिन : जातिवंत गोधनाची वंशावळी केली जातेय जतन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी संबंधित आहे, जेणेकरून पशुसंवर्धनात आधुनिक बदल करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.विदेशी जातींपासून संकरीकरणाचा अप्रत्यक्ष परिणाम देशीपासून गावठी/नॉन डिस्क्रिप्ट पशुधन निर्माण झाले. अशा काही वंशावळी निर्माण झाल्या आहेत की, त्यांची वर्गवारी करणे कठीण झाले आहे. जातिवंत पशुधनाची वंशावळी जतन करून कृत्रिम रेतनाद्वारे त्याचा उपयोग करणे फायदेशीर ठरत आहे. अधिक उत्पादनांसोबत वातावरणाशी समरस होणारी आनुवंशिकता शोधून शेतकऱ्यांच्या दारात पोहचविण्याची जबाबदारी पशुचिकित्सकांवर आली आहे. २० ते ३० वयोगटातील पदवीधर व सुशिक्षित युवक या व्यवसायाकडे वळले पाहिजे, या दृष्टीने यंत्रे, पैसा व अनुदान पुरविण्याचे काम शासन करीत आहे. पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने राज्यभरात २० मे रोजी शेतकरी कार्यशाळा, परिसंवाद, पशुरोग व वंध्यत्व निवारण शिबिरे, आवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातसुद्धा अनेक कार्यक्रम आयोजित होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी दिली.देशी जातिवंत गोधन होतेय कमीसंवर्धन म्हणजे जोपासना करणे, जपणे, निगा राखणे, आरोग्य अबाधित ठेवणे, नष्ट होण्यापासून बचाव करणे होय. मात्र, अधिकाधिक दूध उत्पादनाच्या स्पर्धेत संकरीकरणाच्या माध्यमातून विदेशी जातीचा वापर सुरू झाल्याने भारतात जातिवंत पशुधनाच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. दूध उत्पादनात अव्वल भारतात जातिवंत गोधनाची गुणओळख अस्पष्ट होत आहे.संख्यात्मक प्रगती झाली; गुणात्मक केव्हा?आज मुक्त अर्थव्यवस्थेच्या युगात दुधाच्या प्रत राखण्याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे. दुधाची गुणवत्ता ही फॅट व एस.एन.एफ.वर ठरविली जाते. डब्ल्यू.टी.ओ.च्या अंमलबजावणीनंतर दुधात बिनरोगकारक जंतूंची संख्या मापदंडाप्रमाणे असावी व प्रतिजैविक औषधांचा अंश दुधामध्ये असायला नको. भारतासारख्या विकसनशील देशातील डेअरी उद्योगात संख्यात्मक प्रगती झाली असली तरी गुणात्मक प्रगतीकरिता विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.महानंदा प्रकल्प ठरतोय संजीवनीअनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पशुपालक आर्थिक डबघाईस आल्याचे स्पष्ट दिसून येते. कमकुवत आर्थिक बाजू शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची करण्यास कारणीभूत ठरत आहे. आर्थिक विषमता या गोष्टीत मारक ठरली आहे. अशा परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन खाते, राष्ट्रीय दुग्धविकास बोर्ड व सदर डेअरीच्या साहाय्याने होत आहेत. या तिन्ही यंत्रणांच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यात ‘महादूध प्रकल्प’ दूध उत्पादकांना अर्थार्जनासाठी फायद्याचा ठरत आहे.