आठ महिन्यात ५१० वीज ग्राहकांवर कारवाई, लाखोंचा दंड वसूल
अमरावती : वीजमीटरमध्ये फेरफार करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. मात्र, असे प्रकार निदर्शनास आल्यास जबर दंड वसूल केला जातो. त्याने वापरलेल्या विजेच्या पाच ते सहा पट दंड वसूल होत असून, विद्युत ग्राहकाने वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास फौजदारी गुन्हा अन् लाखो रुपयांचा दंड वसूल केला जाऊ शकतो, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान आठ महिन्यात ५१० ग्राहकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल केली.
आठ महिन्यांत झालेली कारवाई
महिना ग्राहक वसूल दंड (लाखात)
जानेवारी ७३ २९.६
फेब्रुवारी ७१ १०.९५
मार्च २८ ५.५३
एप्रिल ३२ ६.६४
मे १ ०.०८
जून ६४ २८.२०
जुुलै १२५ ९६.०३
ऑगस्ट ११६ ४५.१०
बॉक्स:
वीज चोरीसाठी अशीही चलाखी
तांत्रिक पद्धतीने मीटरमध्ये इलेक्ट्रीक चीप टाकणे, मीटर स्लो करणे, मीटरमध्ये रिमोट कंट्रोल किट बसवून मीटर चालू - बंद करणे, मीटरच्या मागच्या भागात छिद्र पाडून कनेक्शन डायरेक्ट करणे अशी चलाखी ग्राहकांकडून केली जाते. मात्र, महावितरणचे पथक धाडी टाकून अशा ग्राहकांना शोधून काढतात. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा किंवा वापरलेल्या विजेनुसार लाखो रुपयांचा दंड आकारण्यात येतो.
बॉक्स:
फौजदारी गुन्हा अन् जबरी दंड
मीटरमध्ये फेरफार करताना आढळून आल्यास फौजदारी गुन्हा किंवा जबरी दंड आकारण्याची तरतूद आहे. कलम १३५ व १३६नुसार मीटरमध्ये फेरफार आढळून आल्यास एका केडब्ल्यु एचपीनुसार औद्योगिक ग्राहकांवर १०
हजारांचा दंड केला जातो. तसेच एका केडब्ल्युएचपीच्या वापराकरिता पाच हजारांचा, तर घरगुती वर्गवारीतील ग्राहकांकरिता दोन हजाराच्या दंडाची तरतूद आहे. तसेच दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची यामध्ये तरतूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
प्रत्येक सबडीव्हीजन एई कॉल्टी कंट्रोलची पोस्ट त्यांच्या चोऱ्या पकडण्यात केली जाते. प्रत्येक उपविभागामध्ये एक पथक तयार करून कारवाई केली जाते. मीटरमध्ये कुणीही फेरफार करू नये, तो गुन्हा आहे.
दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण, अमरावती