अमरावती : शहरात मॉडिफाईड केलेले सायलेन्सर दुचाकीला लावून भारधाव वाहन दामटणाऱ्या १५ वाहनांवर शहर वाहतूक पोलिकांनी कारवाई करण्यात आली. यापुढेही शोधमोहीम सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
माॅडिफाईड सायलेन्सर लावलेल्या वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी तशा दुचाकींवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ चे शशिकांत सावत, पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेकडून अशा वाहनांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. दुचाकीस्वारांनी मोठ्या प्रमाणात वाहनाचे सायलेन्सरमध्ये माॅडिफिकेशन केल्याचे शोधमोहिमेत निष्पन्न झाले.
मडगार्डला होल, नवी तऱ्हा
डिटेन केलेल्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. बऱ्याच दुचाकींमध्ये सायलेन्सर माॅडिफाय न करता मागच्या बाजूला मडगार्डला होल करून विशिष्ष्ट आवाज काढला जात असल्याचे आढळून आले. अशा दुचाकीचे मडगार्ड काढून घेण्यात येत आहे.
कोट
ज्यांनी आपल्या दुचाकीचे सायलेन्सर माॅडिफाय केले असतील, त्यात सुधारणा करून घ्यावी. यापुढे सायलेन्सर माॅडिफाॅईड केलेली दुचाकी वाहने आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई व परवाना निलंबित करण्यात येईल.
प्रवीण काळे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक)