शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

खरीपाच्या दुष्काळस्थितीवर मोहोेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:09 AM

अमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरीपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी ...

अमरावती : सुरुवातीला पावसात खंड व नंतर सरासरी पार झालेल्या पावसाने खरीपाची पिके पूर्ण उद्‌ध्वस्त झाली. त्यामुळे अंतिम पैसेवारी काय जाहीर होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, यामध्ये गुरुवारी उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच म्हणजे १,९६० गावांची ४६ पैसेवारी जाहीर केल्याने दुष्काळस्थितीवर शासनाची एकप्रकारे मोहोर लागली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीपात ६,८७,८९३ हेक्टरवर पेरणी झाली. सुरुवातील पावसात काही खंड राहिल्याने मूग, उडीद आदी ६० दिवसांचे पिके पूर्णत: खराब झाली. तर बियाणे कंपन्यांनी उगवणशक्ती नसलेले सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने ५० हजारावर हेक्टरमधील सोयाबीन उगवलेच नाही. याशिवाय सोयाबीन फुलोरावर व काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना ऑगस्ट महिन्यापासून पावसाने जिल्ह्यात रिपरिप लावली ती ऑक्टोबरपर्यत सुरूच होती. यामध्ये सोयाबीन जागेवरच सडले व काही भागात गंज्या सडल्या, सोयाबीनची प्रतवारी खराब झाली. शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनखर्चही पडला नाही.

सरासरीपेक्षा जास्त पावसाने जमिनीत आर्द्रता व ढगाळ वातावरण यामुळे कपाशीवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. गुलाबी बोंडअळीसोबत यंदा ८० टक्के कपाशीवर यंदा बोंडसडचे संकट उद्भवले त्यामुळे कपाशीच्या सरासरी उत्पादनात ५० टक्क्यांनी कमी आलेली आहे. अनेक भागात शेतकऱ्यांनी कपाशी काढून रबीसाठी हरभऱ्याची पेरणी केल्याचे दिसून आले. सततच्या पावसामुळे काही भागात तुरीवर ‘मर’रोगाचा प्रादुर्भाव झाला व आता शीतलहरमध्ये दवाळ गेल्याने तूर जागेवरच सुकत असल्याने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे, त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत खरीपाची अंतिम पैसेवारी ४६ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व आठ प्रकारच्या सवलती मिळण्याच मार्ग मोकळा झालेला आहे.

बॉक्स

पैसेवारीची तालुकानिहाय स्थिती

तालुका ५० पैशाच्या आतील गावे पैसेवारी

अमरावती १३९ ४७

भातकुली १३७ ४७

तिवसा ९५ ४७

चांदूर रेल्वे ९० ४६

धामणगाव रेल्वे ११२ ४१

नांदगाव खंडेश्वर १६१ ४७

मोर्शी १५६ ४४

वरुड १४० ४६

अचलपूर १८५ ४७

चांदूरबाजार १६९ ४७

दर्यापूर १५० ४६

अंजनगाव सुर्जी १२७ ४५

धारणी १५२ ४९

चिखलदरा १४७ ४८

एकूण १४७ ४६

बॉक्स

बोंडसडमुळे २.१७ लाख हेक्टरमधील कपाशी बाधित

यंदा पावसामुळे कपाशीवर बोंडसड, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामध्ये २,४४,००२ हेक्टर क्षेत्रापौकी २,१७,००१ हेक्टरमधील कपाशीचे ३३ टक्क्यावर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५,९९९ हेक्टर, भातकुली १४,०५०, चांदूर रेल्वे ६,२८०, धामणगाव रेल्वे १६,८१०, नांदगाव खंडेश्वर ६,५००, अचलपूर १४,५००, अंजनगाव सुर्जी १७,५३८, दर्यापूर ३६,६०१, धारणी ९०, चिखलदरा १८५९, मोर्शी २९,८२६, वरुड २९,८९१, तिवसा १०,००० व चांदूरबाजार तालुक्यात १६,९५७ हेक्टरमध्ये नुकसान झालेले आहे.