शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

फुल्ल टगेगिरी; मुलीची छेड अन् तिच्याच घरासमोर धिंगाणा; सहा जणांविरूद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: June 29, 2023 5:25 PM

दोघांना पकडले, धुडगुस घालणाऱ्यांमध्ये तिघे अल्पवयीन

अमरावती : ट्युशन संपवून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिची छेड काढण्यात आली. त्या प्रकाराचा जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या नातेवाईकाला शिविगाळ करण्यात आली. ते तीन रोडरोमिओ तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्या घरासमोर जाऊन उभा धिंगाणा घातला. मुलीच्या कुटुंबियांच्या काळजात धस्स करणारी ती गोष्ट वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. २६ ते २८ जूनदरम्यान घडलेल्या त्या धुडगुस प्रकरणी वलगाव पोलिसांनी गौरव शिंदे (१८), रूपेश पोहोकार (२३), तुषार बोबडे (२०, तिघेही रा. वलगाव) व तीन विधीसंघर्षित बालकांविरूध्द विनयभंग, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान एक अल्पवयीन मुलगी ट्युशनवरून पायदळ घरी येत असतांना तीनही आरोपी व तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी तिचा पाठलाग केला. शिट्या वाजवून, इशारे करून गल्लीत चल तुझ्यासोबत बोलायचे आहे, असे म्हणून तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला. तिने जीव मुठीत धरून कसेबसे घर गाठले. तथा तत्काळ ती बाब कुटुंबियांना सांगितली. त्यावर तिच्या कुटुंबियांनी तीन आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालकांना समजावून देखील सांगितले होते. दरम्यान २८ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तीनपैकी एक आरोपी समोर दिसताच मुलीच्या नातेवाईकाने त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने त्या नातेवाईकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.

‘त्याला टपकावयचे आहे’!

दरम्यान बुधवारी पिडिताचा नातेवाईक घरी आल्यानंतर तीन आरोपींसह तीन विधीसंघर्षित बालक पिडिताच्या घरासमोरील रस्त्याने समोर गेले व परत तिच्या घरासमोर आले. पिडिताच्या नातेवाईकाचे घर कुठे आहे? त्याला टपकवायचे आहे. असे म्हणत शिवीगाळ करून त्यांनी मारण्याच्या धमक्या दिल्या. पिडिताचे नातेवाईक तसेच मोहल्यातील इतर लोक त्यांना अडवायला आले असता शिवीगाळ व धमक्या देऊन ते तेथून पळून गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीMolestationविनयभंग