शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
3
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
4
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
5
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
6
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
7
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
8
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
9
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
10
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
12
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
13
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
14
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
15
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
16
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
17
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
18
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
19
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
20
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन

सोमवारची रात्र ठरणार निर्णायक

By admin | Published: September 14, 2015 12:00 AM

जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे.

बाजार समिती निवडणूक : मंगळवारी मतदान, गुप्त बैठकांना वेगगणेश वासनिक अमरावतीजिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती आणि भातकुली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. मंगळवार १५ सप्टेंबर रोजी मतदान होत असल्याने सोमवारची रात्र या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘कत्ल की रात’ ठरणार आहे. एव्हाना सर्वच उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन विजयासाठी ‘फिल्डिंग’ लावल्याचे वास्तव आहे.बाजार समिती निवडणुकीत स्थानिक नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. पक्षभेद, विचारसरणी गुंडाळून नेते एकत्र आले आहेत. पॅनेल तयार करुन सहकारक्षेत्रात पकड मजबूत करण्यासाठी विरोधकांना ‘धोबीपछाड’ देण्याची रणनीती आखली जात आहे. एरवी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आरोप- प्रत्यारोप करणारे नेते सध्या बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्र फिरुन मतदारांसमोर जोगवा मागत आहेत. प्रचारादरम्यान बाजार समितीत शेतकऱ्यांना सोयी-सवलती देण्याच्या, भ्रष्टाचार संपविण्याच्या आणि बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करण्याची आश्वासने देऊन सहकारक्षेत्र काबीज करण्यासाठी नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करताना दिसून आलेत. निवडणुकीला उणेपुरे एकच दिवस शिल्लक असल्यामुळे पडद्याआड करावयाच्या राजकारणाची रणनीती सोमवारीच आखली जाणार आहे. या निवडणुकीत प्रमुख तीन पॅनेलमध्ये चुरस असली तरी अडते व व्यापारी मतदारसंघात उमेदवारांनी हायटेक पध्दतीने प्रचार केला. होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर, वृतपत्रातून झळकलेल्या जाहिराती बघून ही निवडणूक विधानसभा, लोकसभेच्या धर्तीवर लढली जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. नेत्यांचे अस्तित्व पणालाअमरावती : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला महत्त्व का आले, हा संशोधनाचा विषय आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाजार समिती खरेच शेतकरी हिताचे काम करते काय, याचा विचार मतदारांनी करणे गरजेचे आहे. सोमवारी रात्री नेत्यांमध्ये छुपे मनोमिलन होण्याचीदेखील दाट शक्यता आहे. तीन पॅनेल मैदानात असले तरी आपल्या गटातील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेत्यांमध्ये आपसी ‘फिक्सिंग’ होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, बैठकांवर जोर देत असताना आपल्या गटातील उमेदवाराला कसे बळ मिळेल, याचे नियोजन नेते करताना दिसून येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रारंभी दोन पॅनेल रिंंगणात राहतील, असे चित्र होते. मात्र जागा वाटपावरून बोलणी फिस्कटली. त्यानंतर आ. रवी राणा यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या शेतकरी एकता पॅनेलचा उदय झाला. तिसऱ्या पॅनेलमुळे निवडणुकीचे एकूण चित्र पालटले आहे. बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी व्यूहरचना, राजकीय खेळी, मुत्सद्दीपणाचा वापर करून मतदारांना गळ घालणे सुरू केले आहे. नेते आणि उमेदवारांसाठी सोमवारची रात्र ही वैरा’ची ठरणार आहे.या निवडणुकीत सहकार पॅनेलमध्ये आ. यशोमती ठाकूर, काँग्रसचे प्रदेश सचिव संजय खोडके, विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश आहे. परिवर्तन पॅनेलची धुरा माजी आमदार संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, मनोज देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्यावर आहे. तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन बोंडे करीत आहेत. पॅनेल स्थापन करून सहकार क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी एकत्र आलेल्या विभिन्न वैचारिक पातळीच्या नेत्यांची दिलजमाई बघून सद्यस्थितीत नेतेही चक्रावून गेले आहेत. (प्रतिनिधी)