परतवाडा : येथील बसस्थानक परिसरात तैनात पोलीस कर्मचाऱ्याने प्रामाणिकतेचा परिचय देत गुरुवारी त्यांना सापडलेले पैशाचे पाकीट वृद्ध महिलेचा शोध घेऊन तिला परत दिले.
परतवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी शाहीन शब्बास खान व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल खानंदे हे बसस्थानकावर कर्तव्य बजावताना त्यांना एक पर्स बेवारस स्थितीत आढळून आली. ती पर्स उघडून पाहिली असता, त्यात रोख ५ हजार रुपये व आधार कार्ड होते. याची माहिती ठाणेदार सदानंद मानकर यांना देण्यात आली. आधार कार्डवरील पत्त्यावरून विमल रामभाऊ भोरे (रा. हरम) यांचा शोध घेऊन त्यांना रकमेसह मिळालेले पाकीट परत करण्यात आले.