अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमत अमरावती:जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. शेतकुंपणाला वीजप्रवाही तारा सोडू नये, याबाबत शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. वीजप्रवाहित तारा निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना नोटिसात आहेत. वाघोबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग करण्यात येत आहे.जंगलालगत असलेल्या शेतातील उभे पीक वन्यप्राणी फस्त करतात. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी आपापल्या शेतात पीक संरक्षणासाठीच नव्हे, तर काही शेतकरी तारांच्या कुंपणामध्ये वीज प्रवाहदेखील सोडतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बळी जातो. मागील आठवड्यात कुंपणातील वीज प्रवाहाने वाघ आणि बिबटाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यात घडली होती. त्यामुळेच का होईना, पण या संघर्षामुळे कधी मानवाचा, तर कधी वन्यजिवांचा हकनाक बळी जात आहे. अख्ख्या महाराष्टत ठिकठिकाणी वन्यजिवांचा विद्युत करंटमुळे जीव बळी गेला. त्यामुळे छुप्या मार्गानेही घातपातांच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन चांदूररेल्वे, चिरोडी वनपरिक्षेत्राच्यावतीने जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात आल्या आहेत. शिवाय नियमित जंगल गस्त करून वन्यप्राण्यांच्या हालचालीवर दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही रेंजच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या वनकर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.नवाबच्या विशेष संरक्षणार्थ उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे अपरात्री जंगलात गस्त घालतात. ट्रॅप कॅमेरे तपासून त्याच्या हालचाली टिपतात.वीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारशेतकुंपणात वीजप्रवाह सोडल्यास व करंट लागून वन्यप्राणी ठार झाल्यास वनविभाग स्वतंत्र गुन्हा दाखल करणार आहे. यासोबत अवैधरीत्या वीजचोरीचा गुन्हा तसेच वीज कंपनी त्यांच्या नियमानुसार गुन्हा दाखल करणार असल्याने वीजप्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.जंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी सुरक्षिततेसाठी रात्रीला व दिवसाला जंगलानजीकच्या शेतीची तपासणी करीत असून शेतकऱ्यांना नोटिशी देण्यात येत आहेत. दोन्ही वर्तुळाचे वनकर्मचारी वन्य प्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वाघाच्या अस्तित्वामुळे पोहरा-चिरोडीच्या जंगलात हे प्रमाण कमी आहे, हेही तितकेच खरे आहे. ही वस्तुस्थिती असली तरी वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने आणखी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
अमरावतीमधील नवाबच्या संरक्षणार्थ कॅमेरा ट्रॅपद्वारे मॉनिटरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:03 AM
अमरावती जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत.
ठळक मुद्देवीजप्रवाह सोडल्यास तीन गुन्हे दाखल होणारजंगलाशेजारील शेतकुंपणांची तपासणी