लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात डेंग्यू आजाराचे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरकडून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना यासंबंधी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला.शहरात डेंग्यूरुग्णांची संख्या आता ११४ झाली आहे. महापालिका क्षेत्रात यापूर्वी ७९ तर ग्रामीण भागात 13 असे एकूण ९२ डेंग्यूबाधितांचे निदान झाले होते. महापालिका क्षेत्रात डेंग्यूबाधितांची संख्या शंभरी पार गेल्याने नागरिकांमध्ये या आजाराची भीती व स्वच्छतेविषयी सजगता वाढली असून, आरोग्य यंत्रणेने त्या अनुषंगाने सतर्कता बाळगण्याची गरज आहे. शासनाची आकडेवारी दीडशेच्या आत आटोपली असली तरी शहरातील तज्ज्ञ खासगी डॉक्टरांकडे डेंग्यूसंंबधी उपचार घेणाºयांची संख्या शेकड्याच्या घरात आहे. डेंग्यूसाठी उपयुक्त असलेली एनएस-वन ही चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे.महापालिका व जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणा खासगी डॉक्टरांकडून रक्तनमुने घेऊन ते यवतमाळ सेंटरला पाठवते. परंतु, या सेंटरकडे पहिल्या पाच दिवसांत निदानासाठी आवश्यक एनएस-वन किटच उपलब्ध नसल्याने आठ दिवसानंतर करावयाच्या आयजीएम, आयजीजी व इतर चाचण्यांचा हवाला देण्यात येत आहे. त्या कारणाने खाजगी डॉक्टरकडे रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह, तर शासकीय अहवालात निगेटिव्ह येत असल्याचे बोलले जात आहे.ग्रामीण भागात नऊ रुग्ण पॉझिटिव्हजिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आलेल्या डेंगूसंशयित रुणांच्या रक्त नमुन्यांमध्ये नऊ नमुने पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल सेंटिनल सेंटरने दिला आहे. यापूर्वी ग्रामीण भागात १३ डेंग्यूबाधित आले होते. आता त्यात भर पडून ग्रामीणमध्ये एकूण २२ रुग्ण, तर जिल्ह्यात १३६ रुग्ण असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा करते तरी काय, असा सवाल केला जात आहे.
डेंग्यूचे आणखी ३५ रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:32 PM
महापालिका क्षेत्रात डेंग्यू आजाराचे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरकडून जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना यासंबंधी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. शहरात डेंग्यूरुग्णांची संख्या आता ११४ झाली आहे.
ठळक मुद्देखळबळ : जिल्ह्यात एकूण १३६ डेंग्यूबाधित