शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

खरीप विम्यात सव्वा लाख शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ ...

ठळक मुद्देदीड लाख हेक्टर संरक्षित : ८२५६२ गैरकर्जदार, ३९५६२ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सुरुवातीपासून पावसाची सरासरी कमी आहे त्यातच २ जुलैपासून तब्बल १८ दिवस पावसाने ओढ दिली. दुष्काळाच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. यामुळे किमान पिकांना आपत्तीच्या काळात संरक्षण मिळून आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यातील १ लाख २२ हजार २२४ शेतकऱ्यांनी ३१ जुलै या अखेरच्या दिवसापर्यंत किमान दीड लाख हेक्टरवरील पिकाचा विमा उतरविला आहे. भरपाईसाठी विमा कंपन्यांच्या अनुभव फारसा चांगला नसल्याने निम्म्या शेतकºयांनी याकडे पाठ फिरविली असल्याचे वास्तव आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास पीक संरक्षण, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकºयांना नावीन्यपूर्व व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरास प्रोत्साहन देणे तसेच कृषिक्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हे या योजनेचे उद्देश असले तरी मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव विपरीतच आहे. मागील वर्षी म्हणजेच २०१८-१९ या हंगामात १ लाख ५४ हजार ४९३ शेतकऱ्यांनी १ लाख ५५ हजार ३९० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला. प्रत्यक्षात यासाठी ४७ कोटी ७ लाख ३ हजारांचा हप्तादेखील भरणा केला. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे पाच तालुक्यांत दुष्काळ व १३ तालुक्यांची पैसेवारी ही ४६ राहिली. तरीही विमा कंपन्यांद्वारे फक्त ८,४४४ शेतकऱ्यांना ६ कोटी ६४ लाख ५८ हजारांची भरपाई मिळाली.प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी यावेळी २४ जुलै ही अंतिम तारीख होती. मात्र, सर्व्हर डाऊनसह आॅनलाइन सातबारा मिळण्यात येणाºया तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे पाच दिवसांची म्हणजेच २९ जुलै व नंतर ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळघार पाऊस होत असल्याने मुदतवाढीचा फारसा फायदा शेतकºयांना झालेला नाही.पीक विमा योजनेसाठी नुकसानभरपाई ही विमा क्षेत्र घटकातील कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. एखाद्या निर्धारित क्षेत्रात संबंधित पिकाचे हेक्टरी सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आले, तर त्या क्षेत्रातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे गृहीत धरण्यात येईल, अशी जाहिरात कृषी विभागासह विमा कंपन्या करीत आहेत. प्रत्यक्षात शेतकºयांचा अनुभव मात्र त्याच्या विपरीत आहे. तालुका घटक गृहीत न धरता संबंधित गावक्षेत्रातील सरासरी उत्पन्नावर शेतकºयांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा