लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.शहरातील अस्तव्यस्त व बेशिस्त वाहतुकीत भर टाकणारी आॅटोरिक्षा प्रवासी वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसात अतिक्षमतेचे प्रवासी वाहतूक करणाºया आॅटोचे शहरात तीन ते चार अपघात झाले. अधिक पैसा कमावण्याच्या उद्देशाने तीन ते पाच प्रवासी बसविण्याऐवजी आठ ते दहा प्रवासी बसविण्याचे प्रकार शहरात सुरू होते. याकडे पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केले होते. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी पोलीस ठाण्यांना अशा आॅटोरिक्षांवर कारवाईचे निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिसांनी आता क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांवर कारवाईचा सपाटा सुरू केला. आठवडाभरात दररोज दहा ते पंधरा चालकांविरुध्द पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, धोकादायक वाहतूक करणाऱ्या १५० जणांवर कारवाई केली आहे.वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोनशेवर वाहनांवर कारवाईशहरातील अस्तव्यस्त वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा करण्याचे प्रकार शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा वाहनचालकांविरुद्ध फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जात आहे. आठवड्याभरात पोलिसांनी दोनशेवर वाहन व हातगाडी चालकांविरुद्ध भादंविच्या कलम २८३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.गॅस सिलिंडरच्या धोकादायक वापरावरही कारवाईशहरातील काही हॉटेल व हातगाड्यांवर गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. याविषयी पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई सुरू केली असून, दररोज शेकडो हॉटेल व हातगाडी चालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येत आहे.क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाºया बेशिस्त आॅटोरिक्षांवर कारवाई सुरू आहे. याबाबत सर्व ठाणेदारांना निर्देश दिले आहेत.- प्रदीप चव्हाणपोलीस उपायुक्तक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणणाºया ग्रामीण हद्दीतील आॅटोरिक्षांवर कारवाई सुरु आहे. आठवडाभरात दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली.- रणजीत देसाई, एसीपी
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणारे आॅटो रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:06 PM
अतिक्षमतेची प्रवासी वाहतूक करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या आॅटोरिक्षाचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांनी जवळपास दीडशे आॅटोरिक्षांवर कारवाई केल्यामुळे चालकांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्देपोलिसांकडून कारवाईचा सपाटा : आॅटोरिक्षाचालकांचे धाबे दणाणले