शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पांदन रस्त्यांवर ग्रामस्थांचा ‘मॉर्निंग वॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 11:46 PM

विरली ते मासळ रोडवरील उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून संपूर्ण भंडारा जिल्हावासीयांना स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर आता या जागेचा उपयोग मॉर्निंग वॉक, दौड, व्यायाम व बैठक व्यवस्थेसाठी नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देलोकमत प्रेरणावाट : विरली येथील पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता, जल जीवनाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतभंडारा : विरली ते मासळ रोडवरील उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून संपूर्ण भंडारा जिल्हावासीयांना स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर आता या जागेचा उपयोग मॉर्निंग वॉक, दौड, व्यायाम व बैठक व्यवस्थेसाठी नागरिक करीत आहेत.मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरलेली ही जागा आता त्याच मानवी आरोग्याला तंदुरूस्त ठेवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. उघडया हागणदारीच्या जागेनंतर आता गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचा महत्वाचा निर्णय ग्रामपंचातयने हाती घेतला आहे.जल ही जीवन म्हणून ज्याला संबोधल्या जाते त्या जलाच्या स्त्रोतांना सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची स्वच्छता मोहीम हाती घेवून जीवनाला वाचविण्याचा प्रयत्न आदर्शवत ठरणारा आहे.लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सरपंच लोकेश भेंडाकर, उपसरपंच सिंव्हगडे, ग्राम विकास अधिकारी वरूडकर यांचे नेतृत्वात ग्राम पंचायत पदाधिकारी व गावकºयांच्या सहकार्याने उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी काही दिवसापासून पुढाकार घेण्यात आला आहे. गावातील मासळ रोडवर असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करून उघडया हागणदारीची स्थिती नष्ट करण्यात आलेली आहे. तर उर्वरित अन्य ठिकाणीही २६ जानेवारीपर्यंत सुशोभित करण्यात येणार आहेत.मासळ रोड लगत करण्यात आलेल्या उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यात आली असताना रस्त्याच्या बाजूला असलेले खताचे उकरीडे हटविण्यात आलेले आहे. दोन्ही बाजूला नेट लावण्यात आलेली आहे.बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. स्ट्रिट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वच्छ व सुंदर जागा आता नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुनावते आहे.मॉर्निंग वॉक, व्यायाम व बैठक व्यवस्थाजागेची स्वच्छता, नेट लावून सुशोभिकरण, वृक्षलागवड व बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आल्याने ही जागा आता नागरिकांकरिता मॉर्निंग वॉक, व्यायामसाठी महत्वपूर्ण ठरते आहे. काही दिवसापूर्वी या जागेच्या आसपास व परिसरात माँर्निंग वॉकसाठी नागरिकांची इच्छा राहत नव्हती त्या जागेवर आता माँर्निंग वॉक सुरू झाली आहे. या ठिकाणी येवून तरूण व्यायाम करीत आहेत. तसेच या ठिकाणापासून दौड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तसेच या ठिकाणी सकाळी नागरिक येवून बैठक व्यवस्थेचा लाभ घेत आहेत.

पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची काळजीउघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी पुढाकर घेतल्यानंतर आता गामपंचायतने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करून योजनांच्या अवतीभवती असलेला घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. काही दिवसापूर्वीच जिल्ह्याच्या चमूने विरली येथे जावून उघडया हागणदारीच्या जागेची पहाणी केली होती. त्यानंतर या जागेची स्वच्छता व सुशोभिकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. तेव्हाची पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याबाबत विनंती केली होती. सरपंच भेंडारकर यांनी पुढाकार घेवून स्त्रोतांची स्वच्छता घेण्यासाठी कंबर कसली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची प्लेटफार्म फुटलेले दुरूस्तीकरणे, अवती भवती साचत असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापक करणे, बोअरवेल, विहीरीजवळ साचून असलेले घनकचºयाचे व्यवस्थापन करणे, सांडपाण्याचा निचरा करून स्त्रोतांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायतने पुढाकार घेवून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.