मोर्शी : स्थानिक तानाजी युवा बहुउद्देशीय संघटनेच्यावतीने आयोजित स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण स्थानिक परशुराम सभागृहात भारतीय जनता किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते झाले.
संघटनेच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नरेशचंद्र काठोळे होते. प्रमोदसिंह गड्रेल, योगेश घारड, सातपुडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घोडकी, सामाजिक कार्यकर्ता जगदीश जयस्वाल, प्रवीण राऊत, राहुल शहाणे, उद्धव मोरे, ऋतिक मालपे, सुनील सोमवंशी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी एमपीएससी परीक्षा व यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पदावर रुजू झालेले आयएएस अंकुश नागपुरे, तहसीलदार प्राजक्ता बारसे, नायब तहसीलदार अक्षय गडलिंग, भारतीय रेल्वेतील प्रवीण घोटे व वरिष्ठ पत्रकार अजय पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत अ गटातून प्रथम बक्षीस आनंद नागले (लोणी) याला २१ हजार, द्वितीय बक्षीस श्रेयस बरवट (परतवाडा) याला ११ हजार, तर तृतीय बक्षीस दिनेश बारस्कर (वाघोली) याला सात हजार रुपये रोख देण्यात आले. ब गटातून प्रथम बक्षीस समीक्षा शिरसाट (गणोजा) हिला ११ हजार, द्वितीय बक्षीस गौरी लोखंडे (आलोडा) हिला सात हजार, तर तृतीय बक्षीस ऋषीकेश सियाले (धनोडी) याला पाच हजार रुपये रोख देण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन राज पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष राहुल पंडागरे, प्रवीण गवळी, जय ताटस्कर, दीप कुकडे, देवेश मोहोड, कमलेश वागदरे, अजय धुर्वे, अब्दुल अहफाज, पवन कोल्हारे, अक्षय वाडीकर, अभिषेक झोड, शंतनु शेंद्रे, गौरव कोंगे, स्वप्निल वगरे, विशाल डेंडुले, रवींद्र बोरवार, सुनील मसराम, धीरज सातव, शुभम कोसे, शुभम भोजने, पवन मडीकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संयोजन राहुल आमले, सौरभ कुकडे, अर्जुन अमृते, बंटी नागले, राहुल शहाणे यांनी केले.