मोर्शी शहरात विकासकामे व्हावीत या दृष्टीकोणातुन वैशिष्ट्य पूर्ण निधी अंतर्गत विविध प्रभागांमधील रस्ता खडीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, नाली बांधकाम, खुल्या जागेला चेनलिंग फेसिंग तसेच भारतरत्न स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यूपीएससी एमपीएससी स्टडी ॲकेडमी तयार करणे अशा एकूण २३ विकासकामांकरिता २.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये धार्मिक व सामाजिक विकासकामे होणार असून, सर्वसमावेशक विकासकामांना आमदार देवेंद्र भुयार यांनी प्राधान्य दिले आहे. मागील काही वर्षांपासून नगरपरिषदेची काही विकास कामे रखडली होती. सदर निधी शासननिर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून नगरपरिषदेला खर्च करणे बंधनकारक आहे.
प्रतिक्रिया
आमदार देवेंद्र भुयार यांच्याकडे आम्ही शहरातील प्रत्येक वाॅर्डसाठी निधीची मागणी केली व त्यांनी ती मंजूर केली. असाच निधी शहराच्या विकासासाठी मिळावा व मोर्शी शहराचा विकास व्हावा.
- मेघना मडघे, नगराध्यक्ष
----------------