मोर्शी : प्रोअँक्टिव ॲबॅकस राष्ट्रीय उन्हाळी स्पर्धा २०२१ मध्ये भारताबरोबर आठ देशातील १६ राज्य १५२ जिल्ह्यांमधून ४५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामध्ये येथील न्यू व्हिजनचे ४७ विद्यार्थी विजेते ठरले. त्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवाजी उच्च माध्यमिक शाळेचे उपमुख्याध्यापक एस आर देशमुख, एकविरा स्कूल ऑफ बिलियंट्सचे उपप्राचार्य मंगेश वाळके, इंग्लिश कोचिंग क्लासचे संचालक मनीष पावडे, रुपेश मेश्राम यांच्या हस्ते २९ ऑगस्ट रोजी न्यू व्हिजन सेंटर येथे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँबकस सेंटरच्या संचालिका अर्चना गुल्हाने यांनी केले. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली असून या स्पर्धेसाठी जिल्ह्य व राज्यासह देशाबाहेरील विद्यार्थी सहभागी होते. त्यामुळे आपला विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विनर होतोय हे पालकांसाठी गौरवाची बाब आहे. तसेच या वर्षाचा बेस्ट सेंटर अवाॅर्ड्स न्यू व्हिजन अबॅकस सेंटरला देण्यात आला. लिटिल चॅम्पियन स्पर्धेत भूमिका मनोज गायकी व वंशिका भामकर देशात पहिली आली. अर्चित अंकुश ठाकरे व शरण नांदगावकर दुसरा, श्लोक नरेश मोझरे तिसऱ्या मानांकनात आला. उन्नती धांडे पहिली, अर्णवी सचिन पंचभैये दुसरी कस्तुरी सचिन भोंडे दुसरी अर्णव सचिन आखरे दुसरा, नेत्रा विलास शिरभाते पहिली, स्वरा ठवळी चौथी, दिव्या संतोष डगडे पाचवी, अर्णव अजय भांगे तिसरा, आराध्य विष्णू पवार चौथी, विराज मंगेश खैरकर चौथा, आयुष सचिन आखरे तिसरा, ईश्वरी दयाजी खंडारे चौथी, आभा आशिष अंगनानी तिसरी तसेच उत्तेजनार्थ बक्षीस मनस्वी विनोद माटे, प्रभात प्रदीप मानेकर, अनूप आशिष अंगणानी, अंश प्रज्योत पेठे, यश दिनेश चौधरी, कस्तुरी नितीन ठाकरे, श्लोक अविनाश गाडवे, सोहम योगेश वानखेडे, ओम संजय मलवार मुदुल संदीप पुसलेकर, उन्नती पंकज डांगोरे, पूर्वाशी रुपेश मेश्राम, चंचल बंडू साठवणे, सृष्टी राजेश वाले, ग्रीष्मा दिलीप काकडे, अनुष्का अजय भांगे, अदिती संतोष डगडे ओमशिव संदीप शिरभाते, कृष्णा पवन बंग, लावण्या आशिष पाटील, आस्था प्रज्योत पेठे, संस्कृती राजेंद्र सोनवणे, अक्षरा प्रवीण मानेकर, ओमशिव हरीश नागापुरे, आदिती राजेंद्र सोनवणे, उन्नती राकेश साहू या सर्व विद्यार्थ्यांनी मोर्शीचा सन्मान वाढविला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना अर्चना गुल्हाने, आर्यन गुल्हाने, समृद्धी यांचे मार्गदर्शन लाभले.