मोर्शी : व्यापाऱ्यांच्या जिवंत राहण्याची अगोदर सरकारने तरतूद करावी करावी व नंतर लॉकडाऊन लावावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्शी येथील व्यापारी संघटनेचे आशिष टाकोडे यांनी व्यक्त केली. याप्रकरणी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात असताना लॉकडाऊन पाहिजे म्हणणारे जे दोन-तीन टक्के लोक आहेत, ते नक्कीच सरकारी कर्मचारी आहेत. या सर्वांचा पगार बंद करून तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. सर्वसामान्य जनतेचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. नियम कितीही कठोर असू द्या, लोक त्यांचे पालन करतील. पण, लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी मागणी नवल अग्रवाल,संदीप साबळे, दीपक समर्थ, सचिन डवले,रुपेश पिंजरकर, संदीप पुसलेकर, अंकुश उगले, गजानन कराळे, पंकज खरबकर,भूषण साबळे, मंगेश खैरकर, प्रशांत पाटील, मधुसूदन ठाकरे, प्रदीप इंगळे , उल्हास पवार, प्रफुल याउल, साखेत खटुले, जगदीश तिवारी यांनी केली आहे.