अमरावती- वरूड-मोर्शी तालुक्यात 51 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली. यामध्ये कॉंग्रेसने 27 ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केलं आहे. उर्वरित १५ ग्रामपंचायतींवर भाजपला यश आले. राष्ट्रवादी ५, अपक्ष २, सेनेने २ ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व सिद्ध केले आहे. यात वरूड तालुक्यात १४ ठिकाणी, तर मोर्शी तालुक्यात १३ ठिकाणी काँग्रेसला यश आले आहे.
अमरावती जिल्यातील मोर्शी वरुड मतदार संघात झालेल्या ग्रामपंच्यायत निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी च्या ताब्यात असलेल्या १५ ग्रामपंच्यायती वर भाजपाने झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातील सर्वच ग्रामपंच्यायती यापूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी च्या ताब्यात होत्या. यापैकी १५ ग्रामपंच्यायती जिंकून मोर्शी मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी विरोधकांच्या बालेकील्यात जोरदार मुसंडी मारलेली आहे. ग्रामपंच्यायतीच्या या निकालात मोर्शी मतदार संघात भाजपने घवघवीत यश संपादित केले आहे. आज सकाळ विजयी झालेल्या ग्रामपंच्यायतीच्या क्षेत्रात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. डॉ. अनिल बोंडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले.
मोर्शी मतदार संघातील विजय झालेल्या ग्रामपंच्यायती गव्हानकुंड नंदकिशोर ब्रम्हाने, बाबुलखेडा वंदना जिचकार, डवरगाव चंद्रकांत बोळनाथे, बारगाव मिना मानकर, नांदगाव अश्विनी पंधरे, वंडली मेघा कळसकर, इसापूर सोनल उईके, दुर्गवाडा पंचफुला गरवार (ठाकूर), पिंपळखुटा (मो.) शुभांगी मोलकर, तळणी संदीप भलावी, धानोरा दिनेश जवंजाळ, गणेशपूर विजय शितकारे, बऱ्हाणपूर जयश्री पाटणकर, पिंपळखुटा (ल.) विमल टाके, आष्टगाव महेंद्र भुंबर असे विजयी झालेले सरपंच आहेत. यासर्व विजयी उमेदवारांचे आणि तालुका अध्यक्ष अजय आगरकर, देवेंद्र बोडखे यांच्यासह सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी अभिनंदन केले.