शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा 78 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 5:00 AM

राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

अजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात २ सप्टेंबर रोजी ७८ टक्के जलसंचय झाला आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळल्यास धरण १०० टक्के भरून सर्व १३ दरवाजे उघडू शकतात. या नयनरम्य दृश्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे आणि हा योग आतापर्यंत जुळून न आल्याने त्यांचा हिरमोडदेखील झाला आहे. राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी आहे. २ सप्टेंबर २०२१ पर्यंत या धरणामध्ये ३४१.१०   मीटर पाणी असून, या  धरणामध्ये सध्या ७८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणामध्ये ४३४.४१ दलघमी पाणीसाठा आहे. जुलै-ऑगस्ट हे दोन महिने पावसाचे महत्त्वाचे महिने म्हणून समजले जाते. याच महिन्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण भरेल, अशी शक्यता असते. परंतु, जुलै महिना पूर्णतः कोरडा गेला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु, अप्पर वर्धा धरण  क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याचा येवा कमी झालेला आहे. 

चार दिवसांपासून पाऊसजिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुठले धरण शंभर टक्के भरले, कोणते धरण ओव्हरफ्लो झाले, हे पाहण्याची नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. यासंदर्भात अनेकजण फोनद्वारा विचारत आहेत.

गतवर्षी २ सप्टेंबरला ९२ टक्के जलसाठा धरण क्षेत्रामध्ये आजपर्यंत एकूण ५४५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गतवर्षी याच तारखेला अप्पर वर्धा धरण ९२ टक्के  भरले होते. त्यामुळे नागरिक, विशेषत: पवसाळी पर्यटनासाठी दुचाकी काढताच अप्पर वर्धा गाठणारे या धरणाकडे टक लावून बसले आहेत. 

 

टॅग्स :DamधरणRainपाऊस