शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
2
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
4
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
5
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
6
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
7
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
8
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
9
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
10
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
11
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
12
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
13
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
14
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
15
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
16
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
17
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
18
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
19
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
20
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान

मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा ७८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:13 AM

फोटो- अप्पर वर्धा ०२ पी पान ३ लीड अजय पाटील मोर्शी : विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात २ ...

फोटो- अप्पर वर्धा ०२ पी

पान ३ लीड

अजय पाटील

मोर्शी : विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात २ सप्टेंबर रोजी ७८ टक्के जलसंचय झाला आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळल्यास धरण १०० टक्के भरून सर्व १३ दरवाजे उघडू शकतात. या नयनरम्य दृश्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे आणि हा योग आतापर्यंत जुळून न आल्याने त्यांचा हिरमोडदेखील झाला आहे.

राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी आहे. २ सप्टेंबर २०२१ पर्यंत या धरणामध्ये ३४१.१० मीटर पाणी असून, या धरणामध्ये सध्या ७८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणामध्ये ४३४.४१ दलघमी पाणीसाठा आहे.

जुलै महिना कोरडा

जुलै-ऑगस्ट हे दोन महिने पावसाचे महत्त्वाचे महिने म्हणून समजले जाते. याच महिन्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण भरेल, अशी शक्यता असते. परंतु, जुलै महिना पूर्णतः कोरडा गेला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु, अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याचा येवा कमी झालेला आहे.

गतवर्षी याच तारखेला ९२ टक्के

धरण क्षेत्रामध्ये आजपर्यंत एकूण ५४५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गतवर्षी याच तारखेला अप्पर वर्धा धरण ९२ टक्के भरले होते. त्यामुळे नागरिक, विशेषत: पवसाळी पर्यटनासाठी दुचाकी काढताच अप्पर वर्धा गाठणारे या धरणाकडे टक लावून बसले आहेत.