भाजपचे उपोषण :
मोर्शी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बांधकाम केलेल्या लाभार्थींनाउर्वरित रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. तद्वतच घरकुल लाभार्थींचे अतिक्रमण प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे, या मागणीसाठी २३ मार्चपासून भारतीय भाजपची शहर अध्यक्ष रवि मेटकर यांनी अन्नत्याग उपोषण व इतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोर्शी शहरामध्ये सन २०१७ मध्ये घरकुल योजना लागू करण्यात आली. परंतु, आज चार वर्ष पूर्ण होऊनही या योजनेमध्ये समाविष्ट घरकुलधारकांना शेवटचा टप्पा वितरित करण्यात आला नाही. या योजनेत प्रथमत: ९६३ लाभार्थींपैकी ५४३ जणांना घरकुल वितरित करण्यात आले. त्या लाभार्थींनी आपली घरे पूर्ण बांधून तयार केली. मात्र, अद्यापही त्यांना पूर्ण रक्कम अदा करण्यात आली नाही. घरकुल लाभार्थींचे अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमित करण्यात यावे. मोर्शी शहराला नवीन पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा. हरितपट्टा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आप्पाा गेडाम, गटनेता नितीन राऊत, मनोहर शेंडे, महिला व बाल कल्याण सभापती सुनीता कोहळे, छाया ढोले, प्रीती देशमुख, नगरसेवक हर्षल चौधरी, माजी नगरसेवक अजय आगरकर, ज्योतिप्रसाद मालवीय, माजी नगराध्यक्ष कैलास फंदे, सुनील ढोले, रावसाहेब अढाऊ, डोंगरे, आकाश ढोमणे, माजी नगरसेविका सुनीता कुमरे, प्रतिभा फंदे, शीला प्रमोद धावडे, अनिता लांजेवार आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली.
-----------------