मोर्शी : जिल्ह्यातील पहिल्या वनउद्यान पर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडला. परंतु या लोकार्पण सोहळयानंतर हे वनउद्यान पर्यटकांसाठी खुले झालेच नाही. आणखी चार दिवस तरी हे उद्यान पर्यटकांसाठी खुले राहणार नसल्याची माहिती येथील वनपाल अमोल चौधरी यांनी दिली. वन उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करवून घेण्याची घाई वनविभागाने केली. त्यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. उद्यानाच्याव्दारा शेजारी वन कर्मचाऱ्याचे कार्यालय उभारण्यात आले. २७ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत येथे विटांची जुडाई आणि रंगरंगोटी सुरु होती. वनउद्यानाच्या सुशोभीकरणाचे काम सुरु होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यामुळे वनउद्यान खुले झाल्याचा समज पर्यटकांचा होता, परंतु त्यांना आज परत जावे लागले.
मोर्शीचे वनउद्यान खुले झालेच नाही
By admin | Published: November 29, 2014 11:13 PM