मोर्शी- चांदूर बाजार रस्त्यावर खानापूर बसस्थानक परीसरात डाम्बरिकरण रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलें असून दुचाकी चालक अपघातात जखमी होत आहे.
गावाला वळसा घालून जाणाऱ्या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने येथे वारंवार खड्डे पडतात .हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात गेला आहे . गावाच्या दोन्ही बाजूला सिमेंट रोड बांधकाम झाले आहे. रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे गावातील बांधकाम रखडलेले आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे . रस्त्यावर पडलेल्या खड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा दुचाकीवरून पडून अपघातात जखमी होत आहे. वाहन कोठून काढावे हा प्रश्न आहे . शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या महिलांना याचा अधिक त्रास होत आहे. मागून पुढून येणारे मोठे वाहन दुचाकी चालकांना खड्यातील चिखलाने न्हाऊन पुढे निघून जातात . .हा महिन्यांपूर्वी केलेली डागडुजी पुन्हा उखळली असून खड्डे अधिक मोठे झाले आहे. वारंवार पडणारे खड्डे जिवावर बेतत् असून मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी
लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.