शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

‘सेव्हींग’चे धनादेश वापरून ‘करंट’चा गोरखधंदा

By admin | Published: March 05, 2016 12:22 AM

धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे बनावट धनादेश वटवून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे.

२२.६० लाखांचे फसवणूक प्रकरण : दुसऱ्या आरोपीने उकलले गूढअमरावती : धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या नावे बनावट धनादेश वटवून फसवणूक केल्याच्या प्रकरणाचे गूढ हळूहळू उकलत आहे. याप्रकरणातील दुसऱ्या मास्टरमार्इंडला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री नागपूर जिल्ह्यातून अटक केली. चौकशी दरम्यान बनावट धनादेशाच्या मुळापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. सेव्हिंग खात्याचे धनादेश वापरुन करंट खात्यावर हजारो रुपयांचा धंदा झाला. सायबर सेल प्रमुख एपीआय कांचन पांडे आणि उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाने कळमेश्वर तालुक्यातील खुमारी मोहपा या गावातून विक्रम शशिकांत घोगरे (३५) या आरोपीला गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या सुदीप सोनीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना घोगरेपर्यंत पोहोचता आले. आरोपी सुदीप श्रीराम सोनी याच्या बचत खात्याचे धनादेश बनावट धनादेशासाठी वापरण्यात आले. धनादेशावर मुद्रित मूळ मजकूर बेमालुमपणे खोडून त्यावर बनावट नाव, रक्कम लिहिली गेली आणि त्यानंतर ते धनादेश खरे म्हणून वटविण्यात आले. उपरोक्त दोन आरोपींच्या अन्य एक साथीदाराने गाडगेनगर भागात भाड्याची खोली करताना मोबाईल क्रमांक दिला होता. एटीएममधून रक्कम विड्रॉल केल्यानंतर याच क्रमांकावरुन सुदीप सोनीशी संपर्क साधण्यात आला. एटीएम ट्रान्झॅक्शन, बँक खाती, कॉल डिटेल्सचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर अमरावतीमधील एका बँकेत खाते उघडताना दिलेला मोबाईल क्रमांक आणि घरमालकाला दिलेला मोबाईल क्रमांक ‘ट्रेस’ झाल्याने पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. याप्रकरणी धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावरही पोलिसांनी नजर रोवली आहे. बनावट धनादेश प्रकरणाचे तार नागपूरशीबनावट धनादेश वटवून बँक तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला झटका देणारा दुसरा आरोपी विक्रम शशीकांत घोगरे याला नागपूरहून जेरबंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले. विशेष म्हणजे या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने १ मार्चला सुदीप श्रीराम सोनी (४८, महाल, नागपूर) याला अमरावतीमधील एका हॉटेलमधून अटक केली होती. सहावा धनादेश वटवताना प्रकार उघडएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत कन्यादान योजनेचे ६ धनादेश बनावटरीत्या वटविण्यात आले. त्यापैकी पाच दर्यापूर, अकोला, धारणी, वर्धेला विड्रॉल करण्यात आले. सहावा धनादेश वटला नाही. त्यावेळी हा गोरखधंदा उघड झाला. ४.४०, ४.६०, ४.२५, ४.७० आणि ४.६५ लाखांचे ते धनादेश होते. वटविलेल्या बनावट धनादेशांची रक्कम कळमेश्वर, नागपूर, कामठी आणि नवाथे चौकातील एटीएममधून काढण्यात आली. याच एटीएमच्या धागा पकडून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. असा आहे घटनाक्रम२९ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हा गुन्हा घडला. धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे सुमारे २२.६० लाखांचे बनावट धनादेश वटविण्यात आलेत. ९ जानेवारी २०१६ ला यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या आरोपीला १ मार्चला अटक करण्यात आली. विक्रम घोगरेला कमिशनमुख्य सूत्रधार सुदीप सोनी याने विक्रम घोगरे याला एटीएममधून रक्कम काढण्याच्या मोबदल्यात कमिशन दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विक्रमनेच खऱ्या धनादेशावर खोडतोड करुन बनावट धनादेश ‘प्रिंट’ केले. यात महागड्या प्रिंटर्ससह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला. हे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांचे एक पथक नागपूरला गेले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी दुपारीच धारणीकडे रवाना झाले.