लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीत जोरदार पावसांच्या सरी पडत असताना गणपती बाप्पा मोरयाचे जल्लोषात स्वागत झाले. ढोल ताशांच्या निनादात अवघी अंबानगरी थिरकली. यंदा शहरातील ४७६ मंडळांनी उत्साहात गणेशाची स्थापना केली असून मोठमोठ्या मंडळांच्या शोभायात्रेने अवघी अंबानगरी दुमदुमली होती. यंदा पर्यावरणपुरक गणपती स्थापनेत अमरावतीकरांनी चांगलाच पुढाकार घेतल्याने निसर्गप्रेंमीमध्ये आनंदाचे वातावरण होते.गणेश स्थापनेच्या जय्यत तयारीला महिन्याभरापासून अमरावतीकर लागले होते. त्यांची प्रतीक्षा शुक्रवारी संपली असून गणेश भक्तांमधील उत्साहात लहानग्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वानिच सहभागी घेतला. सकाळपासून घरगुती गणेश स्थापनेला सुरुवात झाली. दुपारनंतर विविध गणेश मंडळांनी ढोल-ताशांचा गजरात गणेश स्थापना केली. 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोषात गुलाल उधळीत, उत्साहात गणेश स्थापना करताना मंडळांचे पदाधिकारी आढळून आलेत. यंदा शहरातील २५ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे केंद्र सुरु होते.पोलिसांचा व्यापक बंदोबस्तगणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी यंदा व्यापक पोलीस बंदोबस्त आहे. त्यासाठी ६ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. १० एसआरपीएफ कंपनी, ३ हजार ५०० होमगार्डसहीत संबधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तैनात राहतील. शहर व ग्रामीण भागात ५५ संवेदनशिल व ५ अतिसंवेदनशिल ठिकाणे असून त्यासाठी एसआरपीएफची तुकडी तैनात राहील.ध्वनी प्रदूषण टाळाध्वनी प्रदूषण नियमावलीनुसार औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसीबल, विपणन क्षेत्रात ६५ व ५५ डेसीबल, रहिवाशी क्षेत्रात ५५ व ४५ डेसीबल व शांतता क्षेत्रात ५० व ४० डिसीबल नुसार आवाजाचे प्रमाण ठरले आहे. या नियमांवलीचे उल्लंघन केल्यास व गुन्हा सिद्ध झाल्यास संबधित व्यक्तींना पाच वर्ष तुरुंगावास, १ लाखांचा दंड होऊ शकतो, तसेच शिक्षा होऊनसुद्धा गुन्हे सुरु ठेवल्यास प्रत्येक दिवसाला पाच हजारांच्या दंडाची तरतुद आहे. ध्वनी प्रदूषणाची तक्रार असल्यास टोल फ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३६४५, १०० क्रमांक, पोलीस नियंत्रण कक्ष, व्हॉटसअॅप क्रमांक ०९९२३०७८६४६, ०९९२३०७८६९६ यावर संपर्क करावा.
मोरया विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 10:46 PM
अंबानगरीत जोरदार पावसांच्या सरी पडत असताना गणपती बाप्पा मोरयाचे जल्लोषात स्वागत झाले.
ठळक मुद्देजल्लोषात स्वागत : ढोल-ताशांच्या निनादात अमरावतीकर थिरकले