लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिप हंगामात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या विषाणुजन्य येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे. इतर रोगापेक्षा हा अधिक हानीकारक असल्याने सरासरी उत्पादनात ५० ते ९० टक्के कमी येण्याची शक्यता असल्याने वेळीच नियोजन करणे महत्त्वाचे आहे.यंदा जिल्ह्यात दोन लाख ८६ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. यामधील बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन पिवळे पडले. सोयाबीनचे पीक हे सध्या शेंगा धरण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.काही उच्च प्रतवारीच्या जमिनीत अधिक ओलावा असल्याने मुळांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात.त्यामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये शोषूूण घेता येत नाही. त्यामुळे पाने पिवळी पडतात. सतत ढगाळ वातावरण असल्यास अपुºया सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. त्यामुळेही पाने पिवळी पडतात. पानावर हिरवे पिवळे चट्टे आढळतात.सूत्रकृमीच्या प्रादुर्भावाने पाने पिवळी पडतात. मुळकुज रोगाच्या प्रादुर्भावानेसुद्धा पाने पिवळी पडतात. त्यामुळे शेंगा पोचट राहतात. सरासरी उत्पादनाच प्रचंड कमी येते. यासाठी वेलीच व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे, असा होतो.पिवळ्या मोझॅकचा प्रसारहा रोग मुंगबीन येलो मोझॅक विषाणूमुळे होतो. या विषाणूची वाहक पांढरी माशी आहे. उबदार तापमान, वाहक पांढºया माशीची अधिक संश्या, अती दाट पेरणी, प्रमाणापेक्षा अधिक नत्राचा वापर या दोन बाबी रोग वाढण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे उत्पादनात घट येणार आहे.अशा आहेत उपाययोजनाविषाणुजन्य रोगाची लक्षणे असलेली झाडे दिसताच त्वरित उपटून जाळावीत. रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी. तणाचा बंदोबस्त करावा. मावा व पांढºया माशीचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायझोफॉस ४० टक्के २५ मिली किंवा अॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पिवळ्या मोझॅकचा पहिल्या ७५ दिवसांपर्यंत प्रादुर्भाव झाल्यास अधिक नुकसान होते. नंतर संक्रमण झाल्यास नुकसानीची पातळी कमी असते. पांढºया माशीच्या व्यवास्थापनासाठी मिथिल डेमेटोन १० मिली किंवा डायमिथिएट १० मिली किंवा थायोमिथोक्जन ०२ ग्रम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.असा आहे सोयाबीन मोझॅकसोयाबीन मोझॅक हा एक विषाणुजन्य रोग आहे. यामुळे ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात कमी येऊ शकते. या रोगाचा प्रसार मावा किडीमुळे व बियाण्यामधील विषाणू कुळातील मोझॅक विषाणुमुळे होतो. झाडाची वाढ खुंटणे. पाने लहान, आखुड, जाडसर होतात. पाने हिरवी दिसतात. झाडाला शेंगा कमी लागतात. त्याही पोचट असतात.दाणे कमी असतात.अशी आहेत रोगाची लक्षणेरोगग्रस्त पानाचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळसर पडून आकाराने लहान होतात. पानातील हरितद्रव्य नाहिसे झाल्याने अन्ननिर्मितीमध्ये बाधा निर्माण होऊन उत्पादनात मोठी कमी येते. हिरवी पिवळी पाने नजरेने ओळखता येतात.
सोयाबीन पिकावर मोझॅकचा अटॅक, नवे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 10:52 PM
यंदाच्या खरिप हंगामात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकावर सध्या विषाणुजन्य येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आहे.
ठळक मुद्देव्यवस्थापन महत्त्वाचे : विषाणूजन्य रोगामुळे सरासरी उत्पादनात कमी