लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा एप्रिल महिना २० वर्षांतील सर्वाधिक हॉट राहिला. यापूर्वी १९९८ मध्ये २० ते २८ मे दरम्यान ४६ ते ४७.५ अंश सेल्सिअस तापमान हे आजवरचे सर्वाधिक राहिले आहे. यावर्षीदेखील १५ मे नंतर उष्णतेची लाट राहण्याची शक्यात असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक व हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलीमे महिन्यातील तापमानाचा विचार करता, १९९८, २००९ आणि २०१३ या तीन वर्षांमध्ये कमाल तापमानाची ४७ अंशाच्या वर नोंद झाली. आतापर्यत १९९९, २००१, २००२, २००५, २००९, २०१०, २०१५ व २०१८ अशा सात वेळा मे महिन्यात कमाल तापमान ४६ अंश किंवा त्यापेक्षा जास्त राहिले आहे, तर २०००, २००४, २००७, २००८ व २०१८ या चार वर्षांमध्ये तुलनात्मकरीत्या कमी तापमान होते. २००४, २००७, २००८ व २०११ या चार वर्षांमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ३८ ते ४२ अंशापर्यत तापमान राहिले आहे.मागील २० वर्षांचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, साधारणत: मे महिन्याच्या पंधरवड्यात दुसऱ्या उष्णतेची लाट असते. आणि कमाल तापमान ४५ ते ४६ अंशापर्यंत राहिले आहे. काही वेळा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ४७ अंशापर्यंत गेलेले आहे.यावर्षीसुद्धा १५ ते ३१ मे दरम्यान एखादी तीव्र उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज असल्याचे बंड यांनी स्पष्ट केले.यंदा एप्रिलमध्ये ४७ अंशाची नोंदआतापर्यंत एप्रिल महिन्याचा विचार करता, सन २०१० मध्ये १५ एप्रिल रोजी तापमान ४६ अंशावर होते. त्यानंतर सन २०१८ पर्यंत कमाल तापमान ४४ ते ४५ अंशाच्या आसपास होते. सन २०१९ मध्ये ४७ अंश या सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली. मागील २० वर्षांचा विचार करता यंदाचा एप्रिल महिना हा सर्वाधिक तापमानाचा राहिला असल्याची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी स्पष्ट केली आहे.
१९९८ मधील मे सर्वाधिक ‘हॉट’; यंदाचा ‘एप्रिल हीट’ २० वर्षांतील सर्वोच्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:37 AM