जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुष्काळाच्या गडद छायेत अवघा महाराष्ट्र झाकोळला जात असून, जिल्ह्यातील मजुरांनाही त्याची झळ पोहोचत आहे. मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे. येत्या काही महिन्यांत हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २१ हजार ७८२ एवढी मजुरांची संख्या होती. यावर्षी दुष्काळाची छाया अधिक गडद असून, मनरेगाच्या कामावर १०० दिवस काम देण्याची हमी असल्याने अशा स्थितीत मजुरांची पावले मनरेगाच्या कामाकडे वळत आहेत. मध्यंतरी अनेक जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये मजुरांची संख्या कमी होती. कालांतराने ही संख्या वाढली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न हाताळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीचा पूर्वानुभव पाहता वर्तमान स्थितीत मनरेगासाठी नोंदणी केलेल्या मजुरांना मागणीनुसार पुरेशी कामे उपलब्ध करण्यात आली आहेत. जेणेकरून मजुरांचे स्थलांतरण थांबेल. सद्यस्थितीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्यात ११ डिसेंबर रोजी सर्वाधिक ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या कामावर होते. त्यानंतर दुसºया क्रमांकावर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ८७९ मजूर कामावर असल्याची नोंद आॅनलाइन रिपोर्टमध्ये आहे.जिल्हानिहाय कामावरील मजूर संख्याअहमदनगर १०,३९०, अकोला ५,०७४, अमरावती ४९,८१४, औरंगाबाद ११,८७९, बीड ८,२२९, भंडारा ५८९०, बुलडाणा ९,१९०, चंद्रपूर ६,०३१, धुळे १०,५७५, गडचिरोली ५,३३५, गोंदिया ८५८९, हिंगोली ५,८२७, जळगाव ६,३४३, जालना ६,७०६, कोल्हापूर १,७१५, लातूर ५,८४३, नागपूर ६४६६, नांदेड १०,६२७, नंदूरबार ९,०७४, नाशिक ९,९५८, उस्मानाबाद ९,७०९, पालघर ८,४६३, परभणी ३,३३२, पुणे १,७०३, रायगड ८९२, रत्नागिरी ५७१५, सांगली ३७०९, सातारा ४४८९, सिंधूदूर्ग १९९३, सोलापूर १,८०५, ठाणे १,११३, वर्धा ४,७५५, वाशिम १०,८७९ आणि यवतमाळ १०,८७९ या प्रमाणे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्हानिहाय मजूर कामावर आहेत.मनरेगा अंतर्गत ११ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी ४९ हजारांवर मजूर कामावर होते. हा आकडा दररोज वाढत असून, मागील पंधरवड्यापेक्षा मजूर व कामांची संख्या वाढली. मनरेगा योजनेत पुरेशी कामे व रोजगार उपलब्ध आहे. मंगळवारी मजुरांचा हा आकडा राज्यात सर्वाधिक राहिला.- संदीप महाजन,उपजिल्हाधिकारी, मग्रारोहयो
राज्यात मनरेगाचे सर्वाधिक मजूर अमरावतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 2:48 PM
मनरेगाच्या कामात शिथिलता देण्यात आल्याने अवघ्या महिनाभरात राज्यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात मंगळवार ११ डिसेंबर रोजी तब्बल ४९ हजार ८१४ मजूर मनरेगाच्या जावून पोहचली आहे.
ठळक मुद्देदुष्काळाची झळसर्वाधिक मजूर मेळघाटात