संदीप मानकर अमरावतीफळांचा राजा आंबा. उन्हाळा आला की रसाळ आंब्याची सर्वांनाच ओढ लागते. एव्हाना बाजारात विविध प्रजातींचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, वरकरणी पिवळेधम्म आणि रसाळ दिसणारे हे फळ यावरील रासायनिक द्रव्यांच्या अतीवापरामुळे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कमी कालावधीत कच्च्या कैऱ्या पिकविण्यासाठी मानवी शरीरास हानीकारक असलेल्या कार्बाईड व इथेलिन गॅसचा वापर सर्रास होत असल्याने आंब्यासोबत लोकांना विषही मोफत मिळत आहे. कॅल्शियम कार्बाईडची पाण्यासोबत प्रक्रिया होऊन अॅसिटेलीन गॅस तयार होतो. त्यापासून कमी दिवसांत फळे पिकविली जातात. येथे हा आरसेनिक फॉस्फरस हायड्राईड तयार होते. हे विषारी पदार्थ असून आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे, तर इथेलिन गॅसमुळेही अनेक आजार बळावतात. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला विक्रीच्या परिसरात आंब्याचे ५ मोठे तर २५ ते ३० घाऊक व्यापारी आहेत. येथून अंबानगरीत आंब्याची ठोक विक्री होते. वेयर हाऊसमध्ये खासगी गोदामात कैऱ्या ठेवल्या जातात. गंभीर आजाराला आमंत्रणअमरावती : येथेच कॅल्शियम कार्बाईड हा इथेलिन गॅस तयार करतो. यांचा वापर करून आंबे पिकविले जात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मोठ्या उत्साहाने आंब्यांची खरेदी करणाऱ्यांना विषारी घातक रासायनिक द्रव्ये या आंब्यांच्या माध्यमातून शरीरात जात असल्याने अनेक आजारांला निमंत्रण दिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते अशा आंब्यांचे सेवन केल्याने किडनी, लिव्हर, कॅन्सरसाखे गंभीर आजार बळावतात. अमरावती बाजार समितीत प्रतिनिधींनी पाहणी केली असता एक व्यापारी कच्चे आंबे ट्रेमध्ये कैऱ्या भरताना आढळून आला. त्यावर विशिष्ट प्रकारच्या स्प्रेमधून कसल्याशा रसायनांची फवारणी केली जात होती. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी ते द्रव्य म्हणजे पाणी असल्याचे सांगितले. परंतु दोन बॉटल्समधील पाणी ढीगभर आंब्यांना कसे पुरणार? हा प्रश्न लोकमत प्रतिनिधीला पडला. अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता येथील होलसेल फळेविक्रेत्यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. बाजारपेठेत दशहरी, बैगनफल्ली-बदाम, लाल पट्टा, हापूस (बंगळुरू), हापूस (देवळगांव), आदी प्रजातींचे आंबे दाखल झाले आहेत. सर्वसाधारण प्रजातींचे आंबे ४० ते १०० रूपये प्रतीकिलो दराने तर देवळगांवच्या हापूस आंब्याला २२०० ते २८०० रुपए प्रती पेटी असा दर आकारला जातोे. एका घाऊक आंबे व्यापाराची दररोजची उलाढाल ५० हजारांच्या घरात आहे. कॅल्शियम कार्बाईडची प्रक्रिया होऊन इथेल अल्कोहोल किंवा इथेलिन गॅस (उ2ऌ4डऌ) तयार होतो. हा अतिशय घातक आहे. हे एकप्रकारचे केमिकल असून फळांवर जास्त डोज झाला तर ते हानीकारक आहे. -राहुल सावरकरप्राध्यापक, रसायनशास्त्रआंबे पिकविण्यासाठी कार्बाईड व इथेलिन गॅसचा सर्रास वापर अन्न, प्रशासन विभागाने करावी कारवाई फळे विकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईड व इथेलिन गॅसचा किंवा इतर रासायनिक पदार्थांचा वापर होत असेल तर अन्न व औषधी प्रशासन विभागाने धाडी टाकून अशा व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. रासायनिक द्रव्ययुक्त फळांची बाजारपेठेत विक्री होत असेल तर त्यांचे सेवन केल्याने किडनी व लिव्हरला धोका संभवतोे. यामुळे भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यताही नाकारात येत नाही. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मेंदूचे आजार होऊ शकतात. - राजेश मुंदे, हृदय व मधुमेहतज्ज्ञ, अमरावती डॉक्टरांच्या मते, असे होतात आजार आंब्यांवर कार्बाईडचा वापर होत असेल तर ते फळांसोबत पोटात गेल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. किडनी, लिव्हर निकामी होऊ शकते. ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्यास कॅन्सर व मेंदूचे आजारही होतात. दूषित फळांचा लहान मुलांच्या शरीरावर घातक परिणाम होतो.काय आहे कॅलशियम कार्बाईड ?कॅलशियम कार्बाईड (उंउ2) चा हवेसोबत संयोग झाला प्रचंड उष्णता तयार होते. त्या उष्णतेनेच फळे पिकतात. त्यामुळे फळे पिकविण्यासाठी याचा सर्रास वापर केला जातो.
आंब्यासोबत विष मोफत !
By admin | Published: April 12, 2016 12:02 AM