लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भाजीबाजार परिसरातील रहिवासी कमला विष्णुपंत अनासाने (९५) यांचे मरणोत्तर देहदान रविवारी करण्यात आले. सून दया अनासाने यांनी यासंबंधी प्रक्रिया पार पाडली. तोपर्यंत कोणीही नातेवाईक पुढे आले नाही. मात्र, सोमवारी रात्री १० वाजता नातेवाइकांनी दया अनासानेंच्या घरावर धडक देत शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या दिल्या. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी सकाळी खोलापुरी गेट पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे.कमला अनासाने यांनी पतीच्या निधनानंतर शेतमजुरी करून चार मुलांचा योग्य सांभाळ केला. तथापि, अलीकडे कुटुंबातील अन्य सदस्य त्यांना वागविण्यास इच्छुक नसल्याने सून दया अनासाने यांनी ही जबाबदारी स्वीकारली. कमला अनासाने यांनी देहदानाचा संकल्प केला होता. दया अनासानेंनी माजी नगरसेवक प्रवीण हरमकर व पीडीएमसीचे डॉ. महेश शर्मा यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आजवर न विचारणाऱ्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी पीडीएमसीत धाव घेतली. महेश अनासाने, प्रकाश अनासाने, विशाल करुले आदी कुटुंबीयांनी कमला अनासानेंचे पार्थीव ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. पार्थिव ताब्यात घेण्याचे प्रयत्न केला. पार्थिव न मिळाल्याने त्यांनी दयाचे घर गाठून सोमवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळ घातला. यावेळी धमक्या देत शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार करण्यासाठी रात्री उशिरा दया अनासाने यांनी खोलापुरी गेट ठाणे गाठले.अखेर तक्रार दाखलपोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ कारवाई केली नसल्याचा आरोप दया अनासानेंनी केला आहे. त्यामुळे त्या मंगळवारी पोलीस आयुक्तालयात पोहोचल्या होत्या. यासंबंधाने ठाणेदार अतुल घारपांडे यांच्याशी संपर्क केला असता, दया अनासाने यांची तक्रार नोंदविण्यात आली असून त्यावर गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन ठाणेदारांनी दिले.
सासूचे मरणोत्तर देहदान, सुनेला धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:19 PM
भाजीबाजार परिसरातील रहिवासी कमला विष्णुपंत अनासाने (९५) यांचे मरणोत्तर देहदान रविवारी करण्यात आले. सून दया अनासाने यांनी यासंबंधी प्रक्रिया पार पाडली.
ठळक मुद्देभाजीबाजार परिसरातील घटना : न्यायासाठी महिला पोहोचली सीपींकडे