शाळा झाल्या सुरू अजूनही बऱ्याच पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
अमरावती : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोरोनाची पहिली लाट ओसल्यानंतर लगेच दुसरी लाट आल्याने शिक्षणावर मोठा परिणाम झाला. मात्र, दीड वर्षानंतर जनजीवन पूर्वपदावर आले, तसेच शाळादेखील सुरू झाल्या आहेत. मात्र आभासी पद्धतीने शासनाच्या आदेशानुसार आता सर्व चाचपणी करून आठवीपासून शाळा ग्रामीण भागात सुरू झाल्या आहे.
मुलेही शाळेत जायला लागली. मात्र, कोरेानाची भीती आईला अद्यापही असून, आपल्या मुलाला शाळेत पाठविताना आईची चांगली घालमेल होत आहे. प्रकृती खराब तर होणार नाही ना, ताप तर येणार नाही ना, अशी काळजी आईला लागली आहे. मुलगा, मुलगी शाळेत गेल्यापासून तर घरी येईपर्यंत जिवात जीव राहत नाही. घरी आल्याबरोबर ठीक आहे ना, चांगला आहे ना, वर्गात कोणाला ताप तर नव्हता ना, खोकला तर नव्हता ना, मास्क तर काढला नाही ना, वेळोवेळी हात धुतले ना, अशी आस्थेना विचारपूस सुरू झाली आहे. शाळेतून आला आता कपडे धुवायला टाका, प्रेमाने काळजीपोटी सांगणेही मुलांना सुरू झाली आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी पालकांमध्ये पाल्यांच्या आरोग्याबाबत काळजी वाटत आहे.
बॉक्स
शाळेतून घरी येताच कपडे बदला आंघोळ करा!
मुले शाळेत जायला लागले. मुलांत आता उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिवसांनी मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे हसणे, खेळणे, बागडणे, गप्पागोष्टी एकत्र बसणे सुरू झाले आहे. घरी गेल्यावर हात साबणाने धुवा,सॅनिटायझरचा वापर करा, कपडे धुवायला टाकून आंघोळ करा, स्वच्छता ठेवा अशा दररोज शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देत आहेत.
अ) मास्क काढू नये
ब )वारंवार हात साबणाने धुवावे किंवा सॅनिटायझर वापरावे.
क) फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे
ड) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी.
बॉक्स
काळजी आहेच पण शिक्षणही महत्त्वाचे
कोट
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण त्यातील अनेक बाबी समजत नव्हत्या. आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने अडचण नाही. पण कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. मात्र, शिक्षणदेखील महत्त्वाचे असल्याचे लक्षात ठेवून शाळेत पाठविते.
- मंजुषा गावंडे,
कोट
दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. कोरोनामुळे शाळेत विद्यार्थीच नव्हते शाळा केव्हा सुरू होणार अशी विचारणा दररोज होतीच. आता शाळा सुरू झाली आहे. पण कोराेना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी भीती आहेच. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- मनीषा घाटे,
कोट
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शिक्षणाचे काही खरे नाही, असे वाटले होते. मात्र, शाळा सुरू झाल्याने मुलांच्या मनावरील दडपण दूर झाले आहे. पण कोराेना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे द्विधामनस्थिती होती. पण शिक्षणही महत्त्वाचे आहे.
- पुष्पा फरदळे,
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण शाळा -७४७
सुरू झालेल्या शाळा -१८२
अद्याप बंद असलेल्या शाळा -५ ६६