लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आईने किडनीदान करून मातृत्व सिद्ध केले आणि मुलाला जीवनप्रवाहात परत आणले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या पुढाकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया पार पडली. येथील ही सलग चौथी यशस्वी शस्त्रक्रिया होती.दर्यापूर तालुक्यातील कोळंबी येथील विमल गोवर्धन घाटे (६७) यांनी त्यांचा मुलगा सचिनला किडणी दिली. ३१ वर्षीय सचिन वर्षभरापासून त्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचार करणारे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अविनाश चौधरी यांनी किडणी प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शन केले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम व वैद्यकीय अधीक्षक टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात सर्व वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी किडणी ट्रान्सप्लांट को-आॅर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी व समाजसेवी अधीक्षक नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांनी परिश्रम घेतले. यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील डॉ. मीनल चव्हाण व प्रकाश येणकर यांचेही सहकार्य लाभले. डॉ. मनीष श्रीगीरीवार, स्नेहल कुळकर्णी, डॉ. आर.एस. फारुखी यांच्या समितीने शस्त्रक्रियेला मान्यता दिली. नागपूर येथील युरोलॉजिस्ट डॉ. संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. भाऊ राजूरकर यांच्या उपस्थितीत सुपर स्पेशालिटीतील युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, राहुल घुले, डॉ. अविनाश चौधरी, डॉ. निखील बडनेरकर, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण व डॉ. प्रणित घोनमोडे यांनी बुधवारी शस्त्रक्रिया पूर्ण केली.यांचेही महत्त्वाचे योगदानशस्त्रक्रियेत सुपर स्पेशालिटीतील यामध्ये अधिसेविका माला सुरपाम, प्रतिभा अंबाडकर, नितीन श्रीखंडे, ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडिले, ज्योती काळे, रीतू बैस, आशा गडवार, अलका मोहोड, भारती घुसे, जमुना मावसकर, शुभांगी टिंगणे, नम्रता दामले यांच्यासह डॉ. कल्पना भागवत, अशोक किनवटकर, अमोल वाडेकर, विनोद पाटील, प्रफुल्ल निमकर यांच्यासह अन्य डॉक्टर, नर्स, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
आईच्या किडनीदानाने मुलाला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 9:48 PM
आईने किडनीदान करून मातृत्व सिद्ध केले आणि मुलाला जीवनप्रवाहात परत आणले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या पुढाकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया पार पडली. येथील ही सलग चौथी यशस्वी शस्त्रक्रिया होती.
ठळक मुद्देकोळंबी येथील रुग्ण : सुपर स्पेशालिटीचे सलग चौथे यश