पालकमंत्री : राज्यस्तरीय पाचवे साहित्य संमेलनअमरावती : आजची तरुण पिढी ही व्यसनाधिनतेच्या आहारी गेली असून ही समस्या समाजापुढे मोठे आव्हान ठरणारे आहे. त्यामुळे निर्व्यसनी समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्तिचे कार्म हे चळवळ म्हणून राबवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी येथे रविवारी केले.संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. उद्योग, खनीकर्म व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित होते. उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुक्ता पुणतांबेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सीईओ किरण कुलकर्णी, उपायुक्त भीमराव खंडाते, दीपक वडकुते आदी उपस्थित होते. संस्था किंवा व्यक्तिंना व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी पुरस्कार मिळाले ते सर्व समाजप्रबोधनाचे काम करतात. व्यसनमुक्तीचे कार्य हे चळवळ म्हणून राबविणे काळाची गरज झाली आहे. शासन व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम, पुरस्कार, समाजजागृती करीत आहे. परंतु व्यसन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:चा मुलगा म्हणून थांबविण्याची मनोवृत्ती जोपर्यंत समाजामध्ये निर्माण होणार नाही तो पर्यंत पुढची पिढी व्यसनधिनतेकडे जाण्यावाचून आपण थांबू शकणार नाही. अशा पद्धतीची व्यसनमुक्तीची संम्मेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली तर राज्यात एकही व्यक्ती व्यसनाधिन राहणार नाही, असे मत पालकमंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक पियुष सिंह यांनी, संचलन रेणुका देशकर व आभार प्रदर्शन भालचंद्र मळे यांनी केले.
व्यसनमुक्तीचे कार्य चळवळ व्हावी
By admin | Published: March 20, 2017 12:05 AM